राज्यात कांदा ५०० ते ६००० रूपये प्रतिक्विंटल

राज्यात कांदा ५०० ते ६००० रूपये प्रतिक्विंटल
राज्यात कांदा ५०० ते ६००० रूपये प्रतिक्विंटल

सोलापुरात सर्वाधिक ६००० रुपये

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याला चांगलाच उठाव मिळाला. त्याची आवकही तुलनेने कमीच आहे. कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ६००० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक रोज २० ते ४० गाड्यापर्यंत राहिली. ही आवक सर्वाधिक बाहेरील जिल्ह्यातूनच झाली. स्थानिक भागातील आवक अगदीच कमी राहिली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक ६००० रुपये दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही कांद्याची आवक अगदीच कमी १० ते २० गाड्या प्रतिदिन अशी होती. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ५७०० रुपये असा दर मिळाला. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही काहीशी अशीच स्थिती राहिली. आवकही जैसे थे रोज २० ते ५० गाड्याच राहिली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ६००० रुपये दर मिळाला. दरातील किरकोळ चढ-उतार वगळता सुधारणा कायम राहिली.

लासलगावात प्रतिक्विंटलला २००० ते ४८०० रुपये दर

नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ६) उन्हाळ कांद्याची आवक २९२४ क्विंटल झाली. त्यांना प्रतिक्विंटल किमान २००० ते कमाल ४८०० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४४५१ रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंगळवारी (ता. ०५) कांद्याची आवक ३९१३ क्विंटल झाली. त्या   वेळी २३०० ते ५३०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ४५०० रुपये मिळाला. सोमवारी (ता. ४) कांद्याची आवक ३१७६ क्विंटल झाली. त्यांना २३०० ते ५७५७ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ५५०१ रुपये मिळाला. शनिवारी (ता. २) २३७ क्विंटल आवक झाली. त्यास १८९१ ते ५३६९ रुपयांचा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४९०१ रुपये होते.

शुक्रवारी (ता. १) आवक २४९२ क्विंटल झाली. त्यास २१०० ते ४८०१ रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४५५१ रुपये होते. गुरुवारी (ता. ३१)कांद्याची आवक १२७० क्विंटल झाली. त्यास २००० ते ४५८१ रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४१०० रुपये राहिले. मागील आठवड्यापासून बाजार समितीत आवकेत वाढ झाली आहे. बाजारभाव टिकून आहेत. या सप्ताहात ५७५७ रुपये प्रतिक्विंटल सर्वोच्च भाव मिळाला. लाल कांद्याची आवक सुरू झाली असून ती किरकोळ आहे, अशी माहिती मिळाली.

औरंगाबादेत प्रतिक्विंटल ५०० ते ४००० रुपये

औरंगाबाद (प्रतिनिधी) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ७) कांद्याची ९०५ क्विंटल आवक झाली. त्यांना ५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ३१ ऑक्टोबरला ७० क्विंटल आवक झाली. त्या वेळी कांद्याला १४०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. २ नोव्हेंबरला कांद्याची आवक ७९५ क्विंटल झाली. दर  १००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ३ नोव्हेंबर रोजी ८६८ क्विंटल आवक झाली. त्या वेळी कांद्याला ५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. 

४ नोव्हेंबर रोजी ६९३ क्विंटल आवक झाली. त्या वेळी दर १४०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ५ नोव्हेंबर रोजी ८१९ क्विंटल आवक झाली. त्या वेळी कांद्याला १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

नगरमध्ये ३००० ते ५००० रुपये 

 नगर, राहूरी, पारनेर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात कांद्याला साधारण ३००० ते ५००० रुपयाचा दर मिळत मिळत आहे. गेल्या आठवड्यात पारनेरला सर्वाधिक ६००० हजार रुपयाचा दर मिळाला. नगर बाजार समितीत लिलावादिवशी साधारण २० ते ३० हजार गोण्याची आवक होत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

जिल्ह्यामध्ये नगर, पारनेर, राहुरी, कोपरगाव, राहाता, संगमनेर बाजार समितीत कांद्याचे लिलाव होत असतात. नगर बाजार समितीत सोमवार, गुरुवार, शनिवार असे तीन दिवस लिलाव    होतात. येथे सर्वाधिक कांद्याची आवक होत असते. अलिकडच्या काळात    पारनेर बाजार समितीतही कांद्याची आवक वाढू लागली आहे. मागील सप्ताहात रविवारी पारनेर बाजार समितीत कांद्याला सहा हजार रुपयाचा उच्चांकी दर मिळाला होता. 

सध्या नगरसह सर्वच बाजार समितीत कांद्याची आवक कमी जास्त होत आहे. एक क्रमांकाच्या कांद्याला ४००० ते ५०००, दोन क्रमांकाच्या कांद्याला ३५०० ते ३९०० व तीन क्रमांकाच्या कांद्याला १००० ते ३४०० रुपयाचा दर मिळत आहे. गोल्टी कांद्याला ३००० ते ४३०० रुपयाचा दर मिळत आहे. कोरकोळ बाजारात कांदा ४० ते ५० रुपये किलोने विकला जात आहे. नगरला दर लिलावाला साधारण २० हजार ते ३० हजार गोण्याची आवक होत आहे, असे बाजार समितीच्या सूत्राकडून सांगण्यात आले.  

परभणीत १००० ते ३००० रुपये

परभणी  येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याचे दर प्रतिक्विंटल १००० ते ३००० रुपये होते, असे मार्केटमधील सूत्रांनी सांगितले.

येथील मार्केटमध्ये आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी कांद्याची आवक होत असते. सध्या नाशिक जिल्हा तसेच हैदराबाद येथून कांद्याची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील मंगळवारी ५०० ते ६०० आणि शनिवारी ६०० ते ९०० क्विंटल कांद्याची आवक झाली. त्या वेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल सरासरी १००० ते ५००० रुपये होते. मंगळवारी (ता. ५)  कांद्याची क्विंटल झाली होती. त्या वेळी कांद्याचे घाऊक दर प्रतिक्विंटल १००० ते ३००० रुपये होते. गुरुवारी (ता. ७) कांद्याची किरकोळ विक्री प्रतिकिलो ३० ते ६० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी अब्दुल रहिम यांनी सांगितले.

साताऱ्यात २८०० ते ५२०० रूपये 

सातारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरूवारी कांद्याची ५४६ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २८०० ते ५२०० रुपये दर मिळाला आहे. गतमहिन्याच्या तुलनेत कांद्याचे दर सुधारले असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

बाजार समितीत कांद्याची कोरेगाव, खटाव, खंडाळा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातून आवक होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दर सुधारले असल्याने नवीन कांद्याची आवक होत आहे. नवीन कांद्यास क्विंटलला २८०० ते ३५०० रूपये, तर जुन्या कांद्यास क्विंटलला ४५०० ते ५२०० असा दर मिळाला. ३१ ऑक्टोबर रोजी कांद्याची ३५० क्विंटल आवक झाली. त्यावेळी क्विंटलला ४००० ते ४५०० असा दर मिळाला होता. २० ऑक्टोबर रोजी कांद्याची ३२२ क्विंटल आवक झाली. त्यावेळी क्विंटलला २५०० ते ३००० असा दर मिळाला होता. या तुलनेत गुरूवारी (ता.७) कांद्याचे दर तेजीत होते. कांद्याची ६० ते ७० रुपये प्रतिकिलो प्रमाणे किरकोळ विक्री केली जात आहे. 

अकोल्यात कांदा प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये

अकोला येथील बाजारात कांदा ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत आहे. किरकोळ बाजारात याच कांद्याचे दर ५० ते ७० रुपयांपर्यंत आहेत. सध्या दिवसाला ८ ते ९ गाडी कांद्याची आवक सुरु असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अकोला बाजारात गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळापासून कांद्याच्या दरांमध्ये तेजी सुरु आहे. पावसाने नवीन कांद्याच्या आवकेवर मोठा परिणाम झाल्याने दर कायम टिकून राहले. या आठवड्यात पाऊस उघडल्याने नवीन आवक वाढल्यास दरांमध्ये कमी येऊ शकते. सध्या चांगल्या दर्जाचा कांदा सर्रास ३००० ते ३५०० दरम्यान विक्री होत आहे. दुय्यम दर्जाचा कांदा २००० पेक्षा अधिक दराने विकत आहे. बाजारात नवीन कांद्याची आवकच सर्वाधिक असून या कांद्यात ओलसरपणा वाढला आहे. कोरडाकांदा सर्रास ३५०० पेक्षाअधिक दराने विकत आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com