agriculture news in Marathi Onion stock limit of retailer curb to 2 ton Maharashtra | Agrowon

किरकोळ व्यापाऱ्यांकरिता कांदासाठा मर्यादा २ टनांवर

कोजेन्सिस वृत्तसेवा
बुधवार, 11 डिसेंबर 2019

मुंबई ः देशात कांद्याचे उत्पादन घटल्याने बाजारातील आवक खूपच कमी झाली. परिणामी, अनेक ठिकाणी दर शंभरीपार गेले. त्यामुळे केंद्र सरकारने किरकोळ व्यापाऱ्यांवरील कांदासाठा मर्यादा सोमवारी (ता. ९) ५ टनांवरून दोन टनांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला. मगील आठवड्यातच सरकारने किरकोळ व्यापाऱ्यांची साठा मर्यादा १० टनांवरून ५ टनांवर आणली होती.

मुंबई ः देशात कांद्याचे उत्पादन घटल्याने बाजारातील आवक खूपच कमी झाली. परिणामी, अनेक ठिकाणी दर शंभरीपार गेले. त्यामुळे केंद्र सरकारने किरकोळ व्यापाऱ्यांवरील कांदासाठा मर्यादा सोमवारी (ता. ९) ५ टनांवरून दोन टनांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला. मगील आठवड्यातच सरकारने किरकोळ व्यापाऱ्यांची साठा मर्यादा १० टनांवरून ५ टनांवर आणली होती.

देशातील कांदा उत्पादक महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये लागवडीच्या काळात पाणीटंचाईच्या संकटामुळे लागवड घटली. तसेच अतिवृष्टी आणि पुराने काढणीला आलेल्या कांदा पिकाचे मोठे नुकसान केले. त्यामुळे खरीप आणि लेट खरीप कांदा उत्पादनात मागील वर्षीच्या तुलनेत २६ टक्के घट झाल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

मागील वर्षी ५२.१ लाख टन कांदा उत्पादन झाले होते. बाजारात कांद्याचे वाढत्या दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांवर साठा मर्यादा, निर्यातबंदी, कांदा आयात आदी उपाय केले. मात्र, दर वाढत राहिले. 

अशी घटविली साठा मर्यादा
सुरुवातीला घाऊक व्यापाऱ्यांवर ५० टन आणि किरकोळ व्यापाऱ्यांवर १० टन साठा मर्यादा घालण्यात आली होती. मात्र मागील आठवड्यात मर्यादेत निम्म्याने घट करून घाऊक २५ टन आणि किरकोळ व्यापाऱ्यांना ५ टन साठा मर्यादा देण्यात आली होती. मात्र तरीही कांदा विक्रमी दर पातळी गाठत असल्याने केंद्र सरकारने सोमवारी (ता. ९) किरकोळ व्यापाऱ्यांची साठा मर्यादा २ टनांवर आणली आहे. 


इतर अॅग्रो विशेष
पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे यांना...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शनिवारी (ता. २५)...
कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरणकोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४...औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत...
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटपजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास...
वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडेपुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास...
गटाने तयार केला `कोकणरत्न' ब्रॅंडकुर्धे (जि. रत्नागिरी) गावातील श्री नवलाई देवी...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...
राज्यातील बाजार समित्या निवडणुका पुढे...पुणे: ज्या बाजार समित्यांच्या निवडणुका...
अण्णासाहेब पाटील महामंडळाने १०००...नगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास...
शेती, जलसंधारण अन् शिक्षणाचा घेतला वसामांडाखळी (जि. परभणी) येथील मातोश्री जिजाऊ ग्राम...
रेशीम संजीवनीरेशीम उद्योगाचा विस्तार व विकास करण्याच्या...
ऑनलाइन बॅंकिंग करताय, सावधान!आधुनिक युगात विज्ञानामुळे नवनवीन शोधांमुळे मानव...
‘पोकरा’मध्ये अखेर जबाबदाऱ्यांचे विभाजनअकोला ः पोकरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कृषी...
कृत्रिम रेतन नियंत्रण कायदा कधी? पुणे: पशुधनाच्या आरोग्याला घातक असलेली सध्याची...
किमान तापमानात होतेय घटपुणे : गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी...
सात-बारा कोरा करण्याची सुबुद्धी सरकारला...पंढरपूर, जि. सोलापूर: विधानसभा...
सरकारी पीकविमा कंपनी हवी : शेतकरी...नागपूर ः खासगी कंपन्या तयार नसतील तर केंद्राने...