agriculture news in marathi, Onion stock limitation starts | Page 3 ||| Agrowon

कांदा साठवणुकीवर निर्बंध घालण्यास प्रारंभ; प्रशासन हरकतीत

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

नाशिक : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीनंतर, कांदा साठवणुकीवर निर्बंध घातले. चार दिवसांपूर्वी या निर्णयाची घोषणा झाल्यानंतर प्रत्यक्षात मात्र बुधवार (ता. २)पासून कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. व्यापाऱ्यांनी कारवाईच्या भीतीपोटी अधिकृत निर्णय हाती येण्याआधीच कार्यवाही सुरू केल्याने दोन दिवस बाजार आणि शेतकरी वेठीस धरला गेला. 

देशात कांदा दर नियंत्रित करण्यासाठी किमान निर्यातमूल्य वाढ, एमएमटीसीच्या माध्यमातून कांदा आयात निविदा, निर्यातबंदी व कांदा व्यापाऱ्यांवर साठवणुकीचे निर्बंध यामुळे दरात घसरण होऊन मोठा आर्थिक फटकासुद्धा कांदा उत्पादकांना सहन करावा लागत आहे. 

नाशिक : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीनंतर, कांदा साठवणुकीवर निर्बंध घातले. चार दिवसांपूर्वी या निर्णयाची घोषणा झाल्यानंतर प्रत्यक्षात मात्र बुधवार (ता. २)पासून कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. व्यापाऱ्यांनी कारवाईच्या भीतीपोटी अधिकृत निर्णय हाती येण्याआधीच कार्यवाही सुरू केल्याने दोन दिवस बाजार आणि शेतकरी वेठीस धरला गेला. 

देशात कांदा दर नियंत्रित करण्यासाठी किमान निर्यातमूल्य वाढ, एमएमटीसीच्या माध्यमातून कांदा आयात निविदा, निर्यातबंदी व कांदा व्यापाऱ्यांवर साठवणुकीचे निर्बंध यामुळे दरात घसरण होऊन मोठा आर्थिक फटकासुद्धा कांदा उत्पादकांना सहन करावा लागत आहे. 

 कांदा नियातबंदीचे परिपत्रक तत्काळ निघाले असले, तरी साठवणुकीवरील निर्बंधांसंदर्भातील अधिकृत पत्र सहायक निबंधक, जिल्हाधिकारी यांना प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे सरकारी कारवाई झाली नव्हती. मात्र, बुधवारी याबाबतीत जिल्हा निबंधकांनी पणन संचालनालय व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या प्रत्यक्ष सूचनेनुसार नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांदा साठवणुकीवर निर्बंध घालण्याच्या कामकाजाला प्रारंभ केला. जिल्हा निबंधक कार्यालयाने तातडीने कामकाज सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. 

बाजार समितीमध्ये परवानाधारक कांदा व्यापाऱ्याचा होणारा दैनंदिन व्यवहार यावर तालुका सहायक निबंधक व संबंधित बाजार समिती प्रशासन कामकाजावर लक्ष ठेवणार आहे. त्यामुळे दररोज होणारी कांदा आवक, निर्गती व शिल्लक साठ्याची तपासणी होईल. या आदेशान्वये दररोज होणाऱ्या कामकाजाचा आढावा बाजार समितीला सहायक निबंधक कार्यालयाला सादर करावा लागणार आहे. हा दैनंदिन अहवाल विहित नमुन्यात पाठवावा, असे या आदेशात सांगण्यात आले आहे. कामात कोणतेही दिरंगाई होणार नाही, याबाबत सक्त ताकीद बाजार समितीच्या प्रशासनाला देण्यात आली आहे.  

या आदेशान्वये बाजार समितीला दररोज झालेल्या व्यवहाराची नोंद करीत व्यापाऱ्यांकडील दैनंदिन कांदा शिलकेबाबत एकत्रित माहितीचा गोषवारा पाठवणे बंधनकारक असणार आहे. ज्यामध्ये मुख्यत्वे व्यापाऱ्यांचे नाव, फर्मचे नाव, आरंभी शिल्लक, अहवाल ज्या दिवशीं तयार होईल त्या दिवशीची खरेदी, अखेरची निर्गती, अखेर शिल्लक व जर शिल्लक कांदा शिल्लक असेल तर त्यांची कारणे पाठवावी लागणार आहेत. 

आदेश नसताना झाली कार्यवाही 
रविवारी (ता. २९) केंद्राच्या ग्राहक सेवा व नागरी पुरवठा मंत्रालयाने कांद्याच्या साठेबाजीविरुद्ध घाऊक व्यापाऱ्याला ५०० क्विंटल व किरकोळ व्यापाऱ्याला १०० क्विंटल साठा असावा, अशी सूचना केली. मात्र आदेश नसताना व्यापाऱ्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली होती. बाजार समित्यांनी या प्रकरणात लक्ष घातले नाही. ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी कारवाईच्या भीतीपोटी व्यापार वेठीस धरला गेला. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जर आदेश प्राप्त नव्हते, तर व्यापाऱ्यांनी ही सूचना बिगर लेखी कशी पाळली व का पाळली, असा प्रश्‍न शेतकऱ्यांनी विचारला आहे.


इतर अॅग्रो विशेष
यंदा पायी वारी नाही; दशमीला पंढरीत...पुणे : आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्य शासन...
अरबी समुद्रातून मॉन्सूनची पुढे चालपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाची...पुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
टोळधाडीच्या अस्तित्वाने विदर्भात पसरली...नागपूर   ः टोळधाड मध्यप्रदेशात...
दूध संघांना पेमेंट वाटप सुरुपुणे : राज्यातील दूध संघांनी शेतकऱ्यांना दिलेल्या...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
नाशिक बाजार समिती पुन्हा सुरु;...नाशिक  : नाशिक बाजार समितीत दोन कोरोनाबाधित...
थेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर !परभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...
`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...
मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...
दुग्धव्यवसायातून शेतीला दिला सक्षम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...