Agriculture news in marathi; Onion subsidy hangs in Kalvan taluka | Agrowon

कळवण तालुक्यात कांदा अनुदान लटकले
टीम अॅग्रोवन
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

नाशिक  : कळवण येथील बाजार समितीत डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यामध्ये कांदा विक्री केलेल्या कांदा उत्पादकांना अजूनही कांदा अनुदान मिळालेले नाही. बाजार समिती प्रशासनाने चुकीचे बँकिंग तपशील संबंधित जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला पाठविल्याने शेतकरी अजूनही अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या सदोष कामकाजाचा कांदा उत्पादकांना फटका बसला आहे. 

गेल्या वर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात कळवण बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली होती. त्या काळात कांद्याचे दर पडलेले होते.

नाशिक  : कळवण येथील बाजार समितीत डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यामध्ये कांदा विक्री केलेल्या कांदा उत्पादकांना अजूनही कांदा अनुदान मिळालेले नाही. बाजार समिती प्रशासनाने चुकीचे बँकिंग तपशील संबंधित जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला पाठविल्याने शेतकरी अजूनही अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या सदोष कामकाजाचा कांदा उत्पादकांना फटका बसला आहे. 

गेल्या वर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात कळवण बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली होती. त्या काळात कांद्याचे दर पडलेले होते.

उत्पादन खर्चापेक्षा कमी भावात कांदा विकला गेल्याने शासनाने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान जाहीर केले होते. यानंतर शेतकऱ्यांनी अनुदान मिळण्यासाठी कागदपत्रे जमा करूनही बाजार समितीकडे सादर केली. मात्र बाजार समितीकडून माहिती अद्ययावत करताना खातेक्रमांक, आईएफएससी कोड यामध्ये काही त्रुटी राहिल्या. त्यानुसार अनुदान मिळण्यासाठी लाभार्थ्यांच्या पात्र याद्या पुढील कार्यालयीन कार्यवाहीसाठी गेल्यानंतर माहिती चुकीची असल्याने पैसे वर्ग झाले नाहीत. त्याचा फटका कांदा उत्पादकांना बसला. त्यामुळे बाजार समिती हे याबाबत जबाबदारी झटकत असल्याचे यानिमित्ताने संपर्क साधल्यानंतर समोर आले आहे. 

दोन आठवड्यांपासून कांदा उत्पादक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत बाजार समितीकडे पाठपुरावा करत आहेत. ऑगस्टअखेर कांदा अनुदान वर्ग करण्याची घोषणा केली असूनही अजूनही अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. मात्र, काही शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये तांत्रिक अडचणी आल्याचे सहायक निबंधक व कृषी उत्पन्न बाजार समितीकडून वारंवार सांगण्यात येते, हे अनुदान कधी मिळणार याची फक्त वाट पाहावी लागत आहे. 

बाजार समितीकडून सकारात्मक उत्तर नाही
कांदा अनुदान प्रलंबित असल्याने बाजार समितीच्या सचिवांना विचारणा केली असता ते बाहेर असल्याने कार्यालयाचे अतुल पगार यांना अधिकृत विचारा, असे सांगितले. नंतर त्यांना संपर्क साधला असता. या प्रश्नावर उडवाउडवीची उत्तरे देत त्यांनी अधिक माहिती देणे टाळले.

कांदा अनुदान जाहीर होऊन आम्हाला खात्यावर अनुदान जमा झालेले नाही. तात्काळ अनुदान जमा करावे. नाहीतर शेतीकामाचे गणित कोलमडून जाणार आहे. 
- विजय पगार, कांदा उत्पादक शेतकरी, कळवण.

शेतकऱ्यांनी खातेदारांची नावे, खाते क्रमांक यात चुका होत्या. त्यामुळे त्यादुरुस्त करून माहिती पुन्हा अपलोड करण्यात येईल. शेतकऱ्यांना लवकरच पैसे मिळतील. 
- कांतिलाल गायकवाड, सहायक निबंधक, कळवण

इतर ताज्या घडामोडी
लोक-जैविपा - भर दुष्काळात उभारलेली...शेतकऱ्यांचा पुढाकार अनुभवल्यावर वन विभागाच्या...
नगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस...नगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या...
'या' बाजार समितीत शेतकऱ्यांना अल्प दरात...अकोला : सध्या कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा...
जळगाव जिल्ह्यात सर्वच नुकसानग्रस्तांना...जळगाव : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना...
केंद्रीय पथक आज मराठवाड्यात पीक...औरंगाबाद : मराठवाड्यात ऑक्‍टोबर-...
फळबागांची लागवड खोळंबण्यास ‘तो’ ठरला...पुणे : मागील दोन ते तीन महिन्यांत जोरदार पाऊस...
सांगलीत बेदाणा लिलावास प्रारंभसांगली : दिवाळीच्या महिन्याच्या सुटीनंतर बाजार...
अमरावती जिल्ह्याला २४ टक्‍के...अमरावती : मॉन्सूनोत्तर पावसाचा जिल्ह्यात ८० टक्‍...
परभणी विभागात २८ हजार क्विंटल...परभणी : महाबीजच्या परभणी विभागातील सहा...
हमीभावासाठी 'सीसीआय'ला द्या कापूस : ॲड...वर्धा : ‘‘शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीपेक्षा कमी...
राज्यात रताळी ५०० ते ६००० हजार रुपये...जळगावात २२०० ते ३२०० रुपये  जळगाव...
पेरणीपूर्व मशागतीय पद्धतीने करा...रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई व सूर्यफूल...
कांदा पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य...कांदा उत्पादकता कमी होण्यासाठी असंतुलित खत...
जळगाव जिल्हा परिषदेत निधीवाटपावरून आरोप...जळगाव : जिल्हा परिषद सेस फंड, शिक्षण, महिला-...
वऱ्हाडला पीक नुकसानभरपाईचा २६५ कोटींचा...अकोला : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसाचा फटका...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख टन खते...पुणे : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांची अडचण येऊ...
सांगली जिल्ह्यात भूजल पातळी ५८...सांगली : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपेक्षा यंदा...
नाशिक : भिजलेल्या पिकांमुळे चाऱ्याचा...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने...
धक्कादायक, एकाच गावातल्या ६०० मेंढ्या...नगर  ः मागील महिन्यात अतिवृष्टीने पारनेर...
अधिक उपसा केला तर पाणी टंचाईची शक्यता...लातूर : जिल्ह्यात पावसाळ्याच्या चारही महिन्यांत...