कांदा दरासाठी ‘स्वाभिमानी’चे सोलापूर बाजार समितीत धरणे

कांदा दरासाठी ‘स्वाभिमानी’चे सोलापूर बाजार समितीत धरणे
कांदा दरासाठी ‘स्वाभिमानी’चे सोलापूर बाजार समितीत धरणे

सोलापूर : कांद्याच्या घसरलेल्या दराकडे सरकार काहीच लक्ष देत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत, सरकार केवळ जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा निषेध व्यक्त करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (ता. १०) सोलापुरात थेट बाजार समितीच्या कांदा सेलहॉलमध्येच एकदिवसीय धरणे आंदोलन केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामूद पटेल, उपाध्यक्ष पप्पू पाटील, सचिव उमाशंकर पाटील, संघटक विजय रणदिवे, नरेंद्र पाटील, इक्‍बाल मुजावर, तुकाराम शेतसंदी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. कांद्याला प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान द्यावे, कांद्याच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यात यावे, उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्याला मारहाण केलेल्या आडत्यांवर गुन्हा नोंदवावा यासह विविध मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या.

या वेळी पटेल म्हणाले, की कांदा उत्पादक शेतकऱ्याला सध्या अत्यंत वाईट परिस्थितीशी सामना करावा लागत आहे. कांद्याच्या काढणीचा खर्चही निघत नाही, उलट वाहतुकीचे पैसे त्यांना त्यांच्या खिशातून द्यावे लागत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कांदा दराची ही स्थिती आहे; पण सरकारला त्याबाबत काहीच गांभीर्य नाही. कांदा दराबाबत वेळीच निर्णय घ्या, नाही तर अन्य पद्धतीनेही आम्हाला आंदोलन करता येते, असेही पटेल म्हणाले.

या वेळी सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कांद्याला प्रतिक्विंटल हजारांचेअनुदान द्या, निर्यातीला प्रोत्साहन द्या, अशा मागणीचे फलक या वेळी हातात घेऊन कार्यकर्ते घोषणा देत होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com