कांदा निर्बंधाच्या निर्णयाचा दराला फटका

कांदा निर्बंधाच्या निर्णयाचा दराला फटका
कांदा निर्बंधाच्या निर्णयाचा दराला फटका

नाशिक : केंद्र सरकारच्या निर्बंधांनंतर आत्तापर्यंत कांदा दरात घसरण दिसून आली. साठवणुकीच्या निर्बंधांनंतर व्यवहारांवरच मर्यादा आल्याने कांदा आवकही ७० टक्क्यांपर्यंत मंदावल्याने शेतकऱ्यांचे नुकसान वाढले आहे.  नाशिक जिल्ह्यातील प्रमुख कांदा बाजारामध्ये २९ सप्टेंबरला कांद्याचे किमान निर्यातमूल्य प्रतिमेट्रिक टन ८५० डॉलर केल्यानंतर कांद्याचे ३३०० ते ३६०० पर्यंत सर्वसाधारण दर होते. मात्र दुसऱ्या दिवशी हे दर घसरण्याला सुरुवात झाली. त्यात सरकारने पुढे कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. निर्यात बंदिपूर्वी लासलगाव येथे सर्वसाधारण दर ३६०० रुपये होते, तर निर्यातबंदी झाल्यानंतर हे दर घसरून ३००० प्रतिक्विंटल झाले. या निर्णयामुळे दर ६०० रुपयांनी घसरले. तर गुरुवारी (ता. ३) पुन्हा दर घसरून २७०० रुपये प्रतिक्विंटलवर दर आले. सर्वसाधारण दरात किमान ९०० रुपये घट दिसून आली.  पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये निर्यातबंदीपूर्वी दर ३३११ रुपये प्रतिक्विंटल होते, तर निर्यातबंदीनंतर हे दर ३०५१ प्रतिक्विंटल झाले. त्यामुळे २६० रुपयांनी हे दर पडले. तर गुरुवारी (ता. ३) हे दर २६११ रुपये प्रतिक्विंटल झाल्याने ६६० रुपयांनी फटका बसला आहे. त्यामुळे एकंदरीत ३००० रुपये प्रतिक्विंटलच्या वर असणारे दर आता या दराच्या आत आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com