agriculture news in marathi, onion trade restriction causes Rate fall | Page 3 ||| Agrowon

कांदा निर्बंधाच्या निर्णयाचा दराला फटका

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

नाशिक : केंद्र सरकारच्या निर्बंधांनंतर आत्तापर्यंत कांदा दरात घसरण दिसून आली. साठवणुकीच्या निर्बंधांनंतर व्यवहारांवरच मर्यादा आल्याने कांदा आवकही ७० टक्क्यांपर्यंत मंदावल्याने शेतकऱ्यांचे नुकसान वाढले आहे. 

नाशिक : केंद्र सरकारच्या निर्बंधांनंतर आत्तापर्यंत कांदा दरात घसरण दिसून आली. साठवणुकीच्या निर्बंधांनंतर व्यवहारांवरच मर्यादा आल्याने कांदा आवकही ७० टक्क्यांपर्यंत मंदावल्याने शेतकऱ्यांचे नुकसान वाढले आहे. 

नाशिक जिल्ह्यातील प्रमुख कांदा बाजारामध्ये २९ सप्टेंबरला कांद्याचे किमान निर्यातमूल्य प्रतिमेट्रिक टन ८५० डॉलर केल्यानंतर कांद्याचे ३३०० ते ३६०० पर्यंत सर्वसाधारण दर होते. मात्र दुसऱ्या दिवशी हे दर घसरण्याला सुरुवात झाली. त्यात सरकारने पुढे कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. निर्यात बंदिपूर्वी लासलगाव येथे सर्वसाधारण दर ३६०० रुपये होते, तर निर्यातबंदी झाल्यानंतर हे दर घसरून ३००० प्रतिक्विंटल झाले. या निर्णयामुळे दर ६०० रुपयांनी घसरले. तर गुरुवारी (ता. ३) पुन्हा दर घसरून २७०० रुपये प्रतिक्विंटलवर दर आले.

सर्वसाधारण दरात किमान ९०० रुपये घट दिसून आली.  पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये निर्यातबंदीपूर्वी दर ३३११ रुपये प्रतिक्विंटल होते, तर निर्यातबंदीनंतर हे दर ३०५१ प्रतिक्विंटल झाले. त्यामुळे २६० रुपयांनी हे दर पडले. तर गुरुवारी (ता. ३) हे दर २६११ रुपये प्रतिक्विंटल झाल्याने ६६० रुपयांनी फटका बसला आहे. त्यामुळे एकंदरीत ३००० रुपये प्रतिक्विंटलच्या वर असणारे दर आता या दराच्या आत आले आहेत.


इतर अॅग्रो विशेष
यंदा पायी वारी नाही; दशमीला पंढरीत...पुणे : आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्य शासन...
अरबी समुद्रातून मॉन्सूनची पुढे चालपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाची...पुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
टोळधाडीच्या अस्तित्वाने विदर्भात पसरली...नागपूर   ः टोळधाड मध्यप्रदेशात...
दूध संघांना पेमेंट वाटप सुरुपुणे : राज्यातील दूध संघांनी शेतकऱ्यांना दिलेल्या...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
नाशिक बाजार समिती पुन्हा सुरु;...नाशिक  : नाशिक बाजार समितीत दोन कोरोनाबाधित...
थेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर !परभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...
`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...
मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...
दुग्धव्यवसायातून शेतीला दिला सक्षम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...