agriculture news in Marathi Onion trader beaten to farmer Maharashtra | Agrowon

कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 जून 2021

जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची विक्री झाल्यानंतर २४ तासांच्या आत देयके अदा करणे व्यापाऱ्यांना बंधनकारक आहे, अशी नियमावली बाजार समिती वेळोवेळी जाहीर करते.

नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची विक्री झाल्यानंतर २४ तासांच्या आत देयके अदा करणे व्यापाऱ्यांना बंधनकारक आहे, अशी नियमावली बाजार समिती वेळोवेळी जाहीर करते. मात्र प्रत्यक्षात व्यवहाराचे पैसे मागितल्यानंतर हुज्जत घालून शेतकऱ्याला मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात कांदा व्यापाऱ्याच्या खळ्यावर ही घटना घडली. 

याबाबत सविस्तर माहिती अशी, की येवला तालुक्यातील ममदापूर येथील कांदा उत्पादक शेतकरी अक्षय गुडघे सोमवारी (ता. २१) २२ क्विंटल ७० किलो उन्हाळ कांदा विक्रीसाठी घेऊन आले होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कांद्याचा लिलाव झाला. तो रामेश्‍वर अट्टल नामक व्यापाऱ्याने खरेदी केला. वजन करून कांदा खाली केल्यानंतर शेतकरी पैसे घेण्यासाठी गेला असता ‘‘आज पैसे मिळणार नाहीत, उद्या भेटतील’’, असे सांगितले. 

यावर शेतकरी कांदा व्यापारी अट्टल यांच्याकडे गेला. यावर संबंधित व्यापाऱ्याने हुज्जत घटली. ‘‘आता १५ दिवसांनंतर ये,’’ असे सांगून ‘‘तू का भांडला ते सांग,’’ असे म्हणत वाद वाढवला. शेतकऱ्याचे म्हणणे होते, की मी भांडलो नाही, मी नियमाप्रमाणे २४ तासांत पैसे दिले जावे, या मागणीसाठी बोललो, तसा बाजार समितीचा नियम आहे. असे सांगतच ‘‘बाजार समितीत जा, मला नियम शिकवू नको, आता पैसे देत नाही, काय करायचं ते कर,’’ अशा भाषेत बोलत संबंधित व्यापाऱ्याने शेतकऱ्यास धक्काबुक्की करत सौदापट्टी फाडली. 

‘‘मला पैशांची गरज आहे’’ असे शेतकरी वारंवार सांगत होता. मात्र आज पैसे देणार नाही, या भूमिकेवर व्यापारी ठाम होता. शेतकरी पुन्हा बाहेर गेल्यानंतर त्यास येवला बस स्थानकाजवळ गाठून व्यापारी व त्याच्या कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याचे शेतकऱ्याने सांगितले. 

शेतकऱ्यांकडून ‘रास्ता रोको’ 
हा संतापजनक प्रकार समजताच परिसरातील कांदा उत्पादकांनी एकत्र येत येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर नगर-मनमाड महामार्गावर तासभर ‘रास्ता रोको’ केले. उपस्थित कांदा उत्पादकांनी घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. पोलिस येथे आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.  

प्रतिक्रिया 
बाजार समिती संचालक, पोलिस प्रशासन यांची हातमिळवणी आहे. व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हायला हवे. बाजार समिती प्रशासक मंडळ जबाबदारी झटकत आहे. सर्वच व्यापाऱ्यांची बाजू घेणार असेल तर शेतकऱ्यांनी कुणाकडे न्याय मागायचा. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासक मंडळ नेमले. मात्र शेतकऱ्यांना मारहाण होत असेल तर हे प्रशासक मंडळ बरखास्त करा. 
- वाल्मीक सांगळे, जिल्हाध्यक्ष, रयत क्रांती संघटना, नाशिक 


इतर अॅग्रो विशेष
सोयाबीनमधील सुधारित तंत्र पोचले...परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पशुचिकित्सा व्यवसायी आंदोलनाने पशुसेवा...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
अमरावती जिल्ह्यात १८३ जणांना ...अमरावती ः २०१७-१८ मध्ये फवारणीदरम्यान विषबाधेत...
पीकविम्यातील सूचनांचा केंद्राकडून...पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेत विमा कंपन्यांच्या...
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साडेअकरा हजार...मुंबई ः राज्यातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे...
कोकणात काही ठिकाणी मुसळधार पुणे : कोकणात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस...
निविष्ठा वितरणातील अडचणींत लक्ष घालणार...पुणे ः राज्यात निविष्ठा वितरणात अडचणी येत असल्यास...
मराठवाड्यात सव्वा लाख हेक्टरवरील...औरंगाबाद : मराठवाड्यातील सात जिल्ह्यांतील १००३...
साखरेचे किमान विक्री मूल्य तातडीने...कोल्हापूर : सध्या साखर उद्योग संकटात असून,...
सत्तावीस कीडनाशकांच्या बंदीविषयी अहवाल...पुणे ः केंद्रीय कृषी मंत्रालयाने मागील वर्षी...
राज्यात 'शेतमाल तारणा'तून २७ कोटी...पुणे ः कृषी पणन मंडळाद्वारे बाजार समित्यांद्वारा...
राज्यात आज हलक्या सरींची शक्यता पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
पशुचिकित्सा व्यवसायींचा राज्यभर बेमुदत...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पावसाची...पुणे : हवामान विभागाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा...
पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के तात्काळ...पुणेः राज्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप...
खोटे बोलण्यासाठी नाही, प्रामाणिक...भिलवडी, जि. सांगली : ‘‘मी तत्काळ मदतीबाबत विचार...
'रेडग्लोब’ द्राक्षवाणात मिळवली ओळखपुणे जिल्ह्यातील खोडद येथील सुहास थोरात यांनी...
उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांमधून मिळवली...बोरगाव खुर्द (ता.. जि.. अकोला) येथील महेश वानखडे...
शेतकऱ्यांनी वापरले ६५० कोटींचे घरचे...पुणेः राज्यात यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ...
कोकणात हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र...