नवी दिल्ली : नाशिकमध्ये २२ जणांचे प्राण घेणाऱ्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण दे
ताज्या घडामोडी
नेपाळच्या कांदा व्यापाऱ्याला पोलिसांच्या मदतीने मिळाली रक्कम
नेपाळमधील कांदा व्यापाऱ्याची फसवणूक झाल्यानंतर ते मदतीला धावून आले आहेत. त्यांच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या नेपाळच्या कांदा व्यापाऱ्यास अवघ्या २४ तासांत पैसे परत मिळाले आहेत.
नाशिक : जिल्ह्यात शेतमाल विक्री पश्चात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी मोहीम हाती घेतली आहे. या माध्यमातून द्राक्ष, डाळिंब व भाजीपाला उत्पादकांना पैसे मिळवून देण्यात मोठी मदत झाली. मात्र नुसते शेतकरीच नाही तर आता नेपाळमधील कांदा व्यापाऱ्याची फसवणूक झाल्यानंतर ते मदतीला धावून आले आहेत. त्यांच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या नेपाळच्या कांदा व्यापाऱ्यासा अवघ्या २४ तासांत पैसे परत मिळाले आहेत.
नेपाळमधील कांदा व्यापारी राजाराम मुक्तीनाथ रेग्मी यांना स्वस्तात कांदा देतो म्हणून ग्रीबेल एक्सपोर्टचे संचालक राहुल कचरू चौधरी (रा. निंबोळे, ता. चांदवड) याने ऑनलाइन पद्धतीने साडेसहा लाख रुपयांची रक्कम घेतली होती. मात्र, पैसे घेऊनही कांदा दिला नाही. रेग्मी यांनी चौधरी यांना वेळोवेळी संपर्क साधला. कांदा द्या नाहीतर पाठवलेले पैसे परत द्या, अशी वेळोवेळी मागणी केली. परंतु व्यापाऱ्यांकडून पैसे देण्यास टाळाटाळ होत असल्याचे बघताच नेपाळच्या खरेदीदाराने व्यापाऱ्यास गाठले. मात्र, व्यापाऱ्याने बनावट धनादेश देत फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले.
फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर व्यापाऱ्याने विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर माहिती मिळाल्यानंतर त्यांची भेट घेतली. झालेल्या फसवणुकीबाबत त्यांनी डॉ. दिघावकर यांना माहिती दिली. त्यांनी नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना कारवाईचे आदेश दिले. खाक्या दाखविताच अवघ्या २४ तासांत नेपाळच्या खरेदीदारास साडेसहा लाख रुपये परत मिळाले.
अवघ्या २४ तासात रक्कम केली परत
पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी लासलगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी साहाय्यक निरीक्षक राहुल वाघ, उपनिरीक्षक विश्वनाथ निमसे, रामकृष्ण सोनवणे, शिपाई प्रदीप आजगे, गणेश बागूल, सागर आरोटे यांचे पथक पाठविले. अवघ्या २४ तासांत संबंधित व्यापाऱ्यास चौधरी यांच्याकडून साडेसहा लाख रुपये मिळवून दिले.