येवल्यातील कांदा व्यापारी भागवताय २५० जणांची भूक

या अडचणीच्या काळात ज्यांच्या जेवणाची अडचण आहे, त्यांच्यासाठी कांदा व्यापारी असोसिएशन, माणूसकी फाउंडेशनने व सोशल मिडीया फोरमने हा उपक्रम हाती घेतला आहे. जोवरही परिस्थिती आहे, तोपर्यत उपक्रम राबविण्याची तयारी आहे. उद्यापासून जेवणाचे पोकीते वाढवून ३५० पर्यत करणार आहोत. - आल्केश कासलीवाल, माणुसकी फाउंडेशन
The onion traders providing food for 250 people
The onion traders providing food for 250 people

येवला : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या संकटाने अनेकांच्या पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न निर्माण केला आहे.अशा संकटकालीन परिस्थितीत आता अनेक सामाजिक हातही पुढे सरसावले असून येथील कांदा व्यापारी असोसिएशन, माणुसकी फाउंडेशन तसेच सोशल मिडीया फोरम यांच्या माध्यमातून रोज २५० भुकेलेल्यांची जेवणाची सोय होत आहे. यामुळे झोपडीतील गरीब, पायी जाणारे वाटसरू आणि भिकाऱ्यांसह आडोशाला बसलेल्या अनेक गरजूंना ताजे अन्न मिळणार आहे. 

कोरोनामुळे शहरातील भटक्या आणि गोरगरिबांसह पायी घरी निघालेल्यांची खाण्यापिण्याचे हाल होत आहे. याबाबत तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कांदा व्यापारी असोसिएशन, माणूसकी फाउंडेशनने रोज जेवणाचे २५० पाकिटे देण्याची तर सोशल मिडीया फोरमने वाटपाची तयारी दर्शवली.

गेल्या दोन दिवसांपासून या उपक्रमाची सुरुवात देखील झाली आहे. कांदा व्यापारी असोसिएशनने संपूर्ण खर्च उचलला असून यासाठी एका आचाऱ्याला शिजवण्याची जवाबदारी दिली आहे. तयार अन्नाचे पाकिटे माणूसकी फाउंडेशन व सोशल मिडीया फोरमचे कार्यकर्ते वितरीत करत आहेत. सुमारे दीड ते दोन महिने हा उपक्रम सातत्याने चालवण्याचे नियोजन केले आहे. 

मास्क, हॅन्डग्लोज घालून पूर्ण सुरक्षेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करत फोरमचे राहुल लोणारी, किरणसिंग परदेशी, योगेश सोनवणे, सचिन सोनवणे, सुभाष गांगुर्डे, तरंग गुजराथी, भूषण शिनकर, अक्षय तांदळे आदी कार्यकर्ते अन्न पाकीट वितरणासाठी सामाजिक बांधिलकीतून मेहनत घेत आहेत. कांदा व्यापारी असोसिएशनचे नंदूशेठ अट्टल, भरत समदडीया आणि सर्व सदस्य व पदाधिकारी, माणूसकी फाउंडेशनचे अल्केश कासलीवाल, सोशल मिडिया फोरमचे समन्वयक बंडू शिंदे आदी या उपक्रमाचे नियोजन करीत आहे. 

गरजूला दिली चप्पल.. 

येथील किरणसिंग परदेशी यांची मदतीची तळमळ वाखाणण्याजोगी आहे. स्वतःची ॲपे रिक्षा ते पाकिटे वाटपासाठी वापरत आहेत. आज पायी जाणाऱ्या एकाच्या पायात चप्पल नसल्याने भर उन्हात होणाऱ्या वेदना त्यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतःची चप्पल काढून त्यांना दिली. तर एकाला प्यायला पाणी नसल्याने दोन किलोमीटर जाऊन त्यांनी पाणी आणून दिले. विशेष म्हणजे पहिल्या दिवसांपासून ते मदतीत सक्रीय आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com