agriculture news in Marathi Onion will import from Egypt Maharashtra | Agrowon

इजिप्तवरून आयात होणार कांदा 

तात्या लांडगे
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

देशातील कांदाटंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने कांदा आयात करण्याचे नियोजन केले आहे. मंत्रालयातून देशातील कांदा लागवड व अपेक्षित उत्पादनाची माहिती तातडीने मागविली आहे. कृषी विभागाकडून माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. 
- सुहास काळे, फलोत्पादन विकास अधिकारी, पुणे 

सोलापूर : देशातील कोणकोणत्या राज्यात कांद्याची लागवड किती झाली आणि अपेक्षित उत्पादन किती होईल, याची माहिती मंत्रालयातून मागविण्यात आली आहे. देशातील अतिवृष्टी व पुरामुळे महाराष्ट्रासह देशातील कांदा उत्पादनात घट झाली आहे. दिवसेंदिवस कांद्याचे दर वाढत असल्याने केंद्र सरकारने आता इजिप्तहून कांदा आयात करण्याचे नियोजन केले आहे. 

केंद्र सरकारने एक लाख टन क्‍विंटलची निविदा काढली असून, काही दिवसांत कांदा देशात आणला जाणार असल्याची माहिती राज्याच्या पणन विभागातील सूत्रांनी सांगितले. अतिवृष्टीचा मोठा परिणाम कांदा लागवड आणि उत्पादनावर झाला. महाराष्ट्रात कांद्याचा कमाल दर क्‍विंटलसाठी नऊ हजारांवर पोचला असून दिल्लीसह अन्य राज्यांमध्येही अशीच स्थिती आहे. 

दरम्यान, गेल्या वेळेस पाकिस्तानावरुन कांदा येणार असल्याने मोठा गोंधळ झाला होता. त्यामुळे तुर्कस्तान अथवा इजिप्तहून कांदा आयात करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यात आता इजिप्तला पसंती देण्यात आली आहे. केंद्र सरकारने कांदा आयातीचे टेंडर काढले असून, गरज पडल्यास आणखी कांदा आयात करण्यात येईल, असेही सूत्रांनी सांगिले.

सप्टेंबर २०१३ पासून कोटा पद्धत बंद केल्याने गरज पडल्यास कांदा आयात करण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्रातील कांदा उत्पादनात घट झाल्याने कांदा आयात केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले. 

तीन दिवसच पुरणार आयातीचा कांदा 
देशात आयात होणारा १ लाख टन कांदा संपूर्ण देशाचा विचार करता केवळ दोन-तीन दिवसांची गरज भागवेल एवढाच असल्याचे अभ्यासकांनी सांगितले. या आयातीचा सध्याच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता नगण्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

 


इतर अॅग्रो विशेष
निर्यातवृद्धीचे शुभसंकेतपावसाळ्यानंतरही सातत्याचे ढगाळ हवामान आणि...
फळांचा राजा संकटाच्या फेऱ्यातमागील नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा...
पूर्णा येथे रेशीम कोषास प्रतिकिलोस ५१५...परभणी : पूर्णा (जि. परभणी) येथील रेशीम कोष...
सांगली जिल्ह्यातून डाळिंब निर्यातीसाठी...सांगली ः जिल्ह्यातून गतवर्षी ८०० टन डाळिंबाची...
‘व्हीएसआय’ची आंतरराष्ट्रीय साखर परिषद...पुणे: वसंतदादा साखर संस्थेच्या वतीने आयोजित...
धोरणात्मक निर्णय, सिंचनाच्या सुविधेमुळे...नवी दिल्ली: धोरणात्मक निर्णय आणि पुढाकार;...
इथेनॉल प्रकल्पासाठी ३६ कारखान्यांनाच...नवी दिल्ली: पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल...
मोहाडीची मिरची निघाली दुबईलाभंडारा ः शेतकरी उत्पादक कंपनीच्या पुढाकारातून...
खाद्यतेल आयात शुल्क घटविण्याचा प्रस्ताव...पुणे : काही दिवसांपूर्वी केंद्र सरकार खाद्यतेल...
‘माफसू’ला मिळाले `केव्हीके`नागपूर ः पशू व मत्स्य विज्ञानाचा प्रसार प्रचार...
गोंदिया, नागपूर, वर्धा येथे पावसाची...पुणे: राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे....
फेब्रुवारीअखेरपासून कर्जमाफीची रक्कम...पुणे : महात्मा फुले कर्जमाफी योजनेत दोन...
`व्हिएसआय`च्या ऊस प्रक्षेत्रांना दोन...पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय)...
सौर पंप तंत्राद्वारे फुलतेय तेवीस...डोर्ले (ता. जि. रत्नागिरी) येथील अजय तेंडूलकर...
व्यवसाय स्वातंत्र्यावर गदा नकोचशेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याबाबतची एक चळवळ...
क्रयशक्ती वाढविणारा हवा अर्थसंकल्पकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी...
कमी फॅटचे दुध पिल्यास म्हतारपण कमी होतं...कमी फॅट(मेद)युक्त दुधाचा आहारामध्ये वापर केल्यास...
विदर्भ, कोकणात आज हलक्या पावसाचा अंदाज पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांअभावी राज्यात थंडी...
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत ५७...नाशिक : राज्यातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत...
दूध उत्पादक महत्त्वाचा दुवा: हरिभाऊ...औरंगाबाद : जिल्हा दूध संघाच्या एकूणच...