कांद्यास दहा किलोस ७० ते २३० रुपये दर

कांद्यास दहा किलोस ७० ते २३० रुपये दर
कांद्यास दहा किलोस ७० ते २३० रुपये दर

कोल्हापूर  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १२) कांद्यास दहा किलोस ७० ते २३० रुपये दर होता. कांद्याची दररोज चौदा ते पंधरा हजार पोती आवक झाली.  बटाट्याची अठराशे पोती आवक होती. बटाट्यास दहा किलोस १२० ते २१० रुपये दर होता. लसणाची १७० पोती आवक होती. लसणास दहा किलोस ८०० ते १७०० रुपये दर मिळाला.

भाजीपाल्यामध्ये टोमॅटोची १५२० कॅरेटची आवक होती. टोमॅटोस दहा किलोस २० ते ६० रुपये दर होता. ओल्या मिरचीची ६७१ पोती आवक होती. ओल्या मिरचीस दहा किलोस २०० ते २७० रुपये दर होता. इतर भाजीपाल्याच्या तुलनेत घेवडा, ओला वाटाणा, गवारीचे दर समाधानकारक होते. घेवड्यास दहा किलोस २०० ते ३००, ओला वाटाण्यास दहा किलोस २५० ते ३८०, गवारीस दहा किलोस २८० ते ६२० रुपये दर होता. भेंडीची १७५ करंड्या आवक होती. भेंडीस दहा किलोस १०० ते ३०० रुपये दर होता. वरण्याची ६९ पोती आवक झाली. वरण्यास २०० ते ३०० रुपये दर मिळाला.  दोडक्‍यास दहा किलोस १०० ते २०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची १८७०० पेंढ्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा २०० ते ७०० रुपये दर होता. पालक, पोकळा, शेपूस शेकडा २०० ते ७०० रुपये दर होता.  शेवगा शेंगेची १०२ पोती आवक झाली. शेवगा शेंगेस दहा किलोस ३०० ते ४६० रुपये दर मिळाला. फळांमध्ये द्राक्षास किलोस१५ ते ३५ रुपये दर होता. डाळिंबाची आठ कॅरेट आवक झाली. डाळिंबास किलोस २० ते ४० रुपये दर मिळाला. अननस डझनास १२० ते १५० रुपये दर होता. ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com