सोलापूर जिल्ह्यातील ऑनलाइनची कामे खोळंबली

``नव्याने होणाऱ्या महा-ऑनलाइन केंद्रचालकांना तालुका स्तरावर संबंधित तहसीलदारांमार्फत यूजर आयडी व पासवर्ड दोन-तीन दिवसांत देण्यात येतील. त्यानंतर त्यांची ऑनलाइनची सर्व कामे सुरळीत सुरू राहतील.`` - संजय तेली, निवासी उपजिल्हाधिकारी
जिल्ह्यातील ऑनलाइनची कामे खोळंबली
जिल्ह्यातील ऑनलाइनची कामे खोळंबली

सोलापूर : जिल्हा सेतू समितीतर्फे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या ऑनलाइनच्या अडचणी सोडविण्याच्या उद्देशाने राज्य सरकारच्या निर्देशानुसार २४६ नव्या महा-ऑनलाइन (आपले सरकार केंद्रे) केंद्रांना मान्यता देण्यात आली. दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतरही या पात्र केंद्रचालकांना अद्यापपर्यंत यूजर आयडी व पासवर्ड मिळालेला नसल्याने त्यांना केंद्रावर ऑनलाइन कामकाज करता येत नाही. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारच्या योजनांचे अर्ज भरण्याकरिता शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गेल्या काही दिवसांपासून खरीप पिकविमा योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची विविध ऑनलाइन केंद्रांवर गर्दी होती. दरम्यान पीकविमा भरण्यासाठी मंगळवारी (ता. ३१) अंतिम मुदत संपली. तसेच कर्जमाफी, पीकविमा, कृषी व जिल्हा परिषदांच्या ऑनलाइन योजनांसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन केंद्रांवरून अर्ज करावे लागतात. मात्र, मागील दीड महिन्यापूर्वी जिल्ह्यात नव्याने मंजूर झालेल्या आपले सरकार केंद्रचालकांना जिल्हा सेतू समितीकडून आणखी पासवर्ड व यूजर आयडी न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीकविमा भरण्यासाठी तालुक्‍याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागले. त्या ठिकाणीही मोठी गर्दी असल्याने व ऑनलाइन सर्व्हर डाउन झाल्याने अनेक शेतकऱ्यांना विमा भरता आला नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com