agriculture news in marathi online agri mortgage loan scheme for farmers by state government | Agrowon

शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध; ‘वखार’ची प्रायोगिक योजना

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 मे 2020

शेतकऱ्यांसाठी महामंडळ आणि राज्य सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाइन तारण कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. 

मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये मालाची साठवणूक करता यावी आणि प्राप्त गोदाम पावतीवर ऑनलाइन पद्धतीने तारण कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी महामंडळ आणि राज्य सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाइन तारण कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. 

श्री. पाटील म्हणाले, ही नावीन्यपूर्ण योजना प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यांसाठी प्रथमतः राबविण्यात येत आहे. यासाठी मिळणारा प्रतिसाद पाहून इतर बँकांच्या माध्यमातूनही सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. राज्य वखार महामंडळाची राज्यात विविध ठिकाणी गोदामे असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य तसेच शेतमाल, औद्योगिक मालाची मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्यात येते.

गोदामातील साठवणुकीवर वखार पावती देण्यात येते, ही वखार पावती वखार अधिनियम, १९६० नुसार पराक्रम्य (Negotiable) असून त्यावर बँकेमार्फत तारण कर्ज उपलब्ध होते. वखार पावतीवर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बँकेमध्ये जाऊन विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. परंतु या नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत शेतकरी वखार महामंडळाच्या संगणकीय प्रणाली आधारे ऑनलाइन पद्धतीने बँकेस तारण कर्जासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करून कर्ज प्राप्त करू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा बँकेत जाण्याचा वेळ व पैसा वाचेल.

यामध्ये ब्लॉक तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याने तारण कर्ज देणे, त्याची परतफेड, सध्याचे बाजार भाव, उपलब्ध अन्न धान्य साठा या सर्व गोष्टी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे ऑनलाइन होणार असल्याने शेतकऱ्याचा मोठा फायदा होणार आहे. आणि ऑनलाइन तात्काळ कर्ज उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांच्या वेळेची बचत तसेच कागदपत्रांसाठीच्या प्रवास खर्चात बचत होण्यास मदत होणार आहे, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

अशी असेल कर्ज प्रक्रिया..

 • शेतकऱ्यांना यासंबंधीचे मोबाईल ॲप्लीकेशन डाऊनलोड करावे लागेल
 • स्मार्टफोनच्या आधारे मराठीमध्ये अर्ज करता येईल
 • मोबाईलवरच आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून पाठविता येतील
 • अर्ज केल्यानंतर बँकेकडून छाननी केली जाईल 
 • वखार पावतीवरील शेतमालाच्या किमतीच्या ७० टक्के कर्ज बँक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करेल 
 • कर्ज सुविधा एक ते दोन दिवसात उपलब्ध करून दिली जाईल 
 • तारण कर्जाचे व्याजदर ९ टक्के असून इतर बँकेच्या तुलनेत कमी आहे
 • तारण कर्जाची कमाल मर्यादा ५ लाख प्रति शेतकरी एवढी असेल
 • वखार महामंडळाकडून शेतकऱ्यांना साठवणूक भाड्यात ५० टक्के सवलत
 • वेळोवेळी कर्जाची रक्कम व व्याजाची माहिती शेतकऱ्यांस मोबाईलवर मिळेल
 • शेतमाल विक्री वेळेस बँकेचे मुद्दल व व्याज ऑनलाइन भरणा केल्यावर शेतकऱ्याच्या वखार पावतीवरील बोजा कमी करण्यात येईल

इतर अॅग्रो विशेष
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...
कृषी सुपर मार्केट ः संकल्पना आणि संधीजागतिकीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेती हा एक आर्थिक...
बदल हवेत दिलासादायकहवामान आधारीत फळपीक विमा योजनेत केळी पिकासाठी...
नैसर्गिक आपत्तीत पीकच नाई, तर बापही...यवतमाळः नैसर्गिक आपत्तीत आमी पीकच नाई, त आमचा...
राज्यात गाईच्या दूध खरेदी दरात कपात नगर ः लॉकडाऊन उघडल्यानंतर दुधाची मागणी वाढल्यावर...
कोरडवाहू, बागायतीसाठी हेक्टरी १० हजार...मुंबई: अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे...
थकबाकीदार ७१ कारखान्यांचे गाळप परवाने ‘...पुणे: राज्यात चालू हंगामात ऊस गाळपासाठी अर्ज...
शेडनेट, फळबागेतून मिळालेल्या ओळखीसह...धुळे जिल्ह्यातील फागणे (ता. धुळे) येथील उमेश व...
कष्ट, नियोजनपूर्वक उभारली आंबा, नारळ,...शासकीय योजनांचा पुरेपूर वापर करताना वरवडे (ता. जि...
शाश्‍वत पर्यायी पीक ः बांबूनिसर्ग चक्र बदलत चालले आहे. आतापर्यंत आपण रेल्वे...
‘जीआय’चे अधिकृत ब्रॅंडींगकोविड महामारीनंतर जागतिक बाजारातही खूप उलटफेर...
अमळनेरच्या भाजी बाजारात शेतकऱ्यांकडून...अमळनेर, जि.जळगाव ः येथील मासळी बाजारानजीकच्या...
लाच घेताना कृषी विद्यापीठातील लिपिकाला...नगर : कोरोना पुणे सेवानिवृत्तीची कागदपत्रे...
राज्यात पीक नुकसान ५० लाख हेक्टरच्या...पुणे: राज्यात खरीप पीक नुकसानीची माहिती गोळा...
जुन्या निकषांनुसार कामाला विमा...जळगाव: जुन्या निकषानुसार केळी पिकासाठी काम...
शेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....
किती अन् काय सांगावं...हात टेकलेत आमचेजालना : कुणाला किती अन् काय सांगावं...सततच्या...
पावसामुळे शेतीकामात अडथळे पुणे ः परतीच्या पावसाचा दणका अजूनही सुरूच आहे....
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात चक्रीय...
बुडून गेलं रान देवा, वाहून गेलं शिवार...कोल्हापूर : उसवलं गणगोत सारं, आधार कुनाचा न्हाई...