सांगली बाजार समितीत हळदीचे दररोज १० हजार पोत्यांचे सौदे

हळदीची सौदे सुरु झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सध्या ई-नाम प्रणालीवरुन हे सौदे होत आहेत. ही यंत्रणा नवीन असली तर आम्ही प्रक्रिया समजून घेतली आहे. - गोलाप मर्दा, हळद व्यापारी, सांगली.
turmeric
turmeric

सांगली : येथील बाजार समितीत गेल्या तीन ते चार दिवसापासून हळदीचे ऑनलाइन सौदे सुरु झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दररोज ८ ते १० हजार पोत्यांची विक्री होत असून प्रति क्विंटल सरासरी ५ ते ७ हजार ५०० रुपये दर मिळत आहे.  कोरोनाच्या भितीने सांगली बाजार समितीतील सर्वच शेतीमालाचे सौदे बंद केले होते. बाजार समिती हळदीच्या सौद्यासाठी देशभरात प्रसिध्द आहे. ठिकाणी देशातील हळद खरेदी-विक्रीसाठी येते. परंतू कोरोनामुळे देश लॉकडाऊन असल्याने हळदीचे सुमारे ४५ दिवस सौदे बंद होते. नवीन हळद काढून झाली होती. परंतू सौदे बंद असल्याने हळदीची विक्री थांबली होती.  दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी ऑनलाइन हळदीचे सौदे करण्याच्या सुचना दिल्यानंतर हळदीचे सौदे सुरु झाले आहेत.  बाजार समितीतील २५० अडते आणि ७० व्यापारी यांनी हळद खरेदीसाठी पुढे आले आहेत. सध्या सांगली जिल्ह्यातील हळदीची खरेदी सुरु झाली असून दररोज ८ ते १० हजार पोत्यांची विक्री होत आहे.  केवळ जिल्ह्यातील हळदीची खरेदी होत आहे. परराज्यातील हळद अजून बाजार समितीत विक्रीस आलेली नाही. येत्या तीन ते चार दिवसात परराज्यातील हळद सौद्यास येण्याची शक्यता व्यापारी वर्गाने वर्तवली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात दिवसातून दोन वेळा हळदीचे सौदे होतात. यावेळी सुमारे २० ते २५ हजार पोती एका सौद्याला येतात. परंतू हळदीची आवक कमी होत असली तरी बाजारात हळदीच्या दरातील तेजी मंदी शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे.  हळदीचे वाण आणि दर  सेलम...६ हजार ते ६ हजार ३००  राजापूरी...७ हजार ते ७ हजार ५००  देशी कडप्पा...५३०० ते ५४००  असे होतात हळदीचे ऑनलाईन लिलाव 

  • खरेदीदार आणि अडत्यांची नोंदणी होऊन लॉगिन आयडी आणि पासवर्ड 
  • ई-नाम पध्दतीने लिलावात अडत्यांकडून सौद्यातील हळदीची माहिती घेवून ती ऑनलाइन अपलोड 
  • प्रत्येक हळद मालासाठी बारकोड 
  • सौदे करण्यासाठी सुमारे तीन तासाचा कालावधी 
  • अडत्यांकडून दिलेल्या माहितीनुसार व्यापाऱ्यांकडून संबंधित दुकानात जाऊन हळदीची पाहणी 
  • या पाहणीनंतर दुकानात येवून त्या कोडनुसार दराची ऑनलाईन केली जाते नोंदणी 
  • संध्याकाळी बाजार समितीकडून संबंझित मालाची कोडनुसार तपासणी केली जाते. 
  • जास्तीची बोली जाहिर केल्यानंतर बळद विक्रीबाबत संमती आणि ऑनलाईन सौद्याचा व्यवहार पूर्ण 
  • प्रतिक्रिया गेल्या तीन चार वर्षापासून ऑनलाइन सौदे घेण्याचा प्रयत्न होता. परंतू ई-नाम बाबत व्यापारी, अडते यांच्यात गैरसमज निर्माण झाला होता. मात्र, कोरोनाच्या संकटात खुले सौदे करताना नियम पाळले जात नव्हते. त्यामुळे ऑनलाइन सौदे करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे ऑनलाइन सौदे सुरु केले असून व्यापारी आणि अडते यांच्यात ई-नाम बाबत झालेला गैरसमज दूर झाला आहे. पुढील काळात ऑनलाइन सौद्यामुळे काम कमी होईल. याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.  - दिनकर पाटील, सभापती, सांगली बाजार समिती, सांगली. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com