agriculture news in marathi Online brainstorming of experts to increase custard export | Agrowon

सीताफळ निर्यात वाढण्यासाठी तज्ज्ञांचे ऑनलाइन विचारमंथन

टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

बीड : सिताफळाची निर्यात वाढावी, यासाठी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी, पणन मंडळाचे अधिकारी, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी ऑनलाइन बैठकीत विचारमंथन केले.

बीड : केंद्र सरकारने डिसेंबर २०१८ कृषी निर्यात धोरण जाहीर केले. राज्यात कृषी निर्यात धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य कृषी पणन मंडळ काम करते. मराठवाड्यात सीताफळाचे बऱ्यापैकी क्षेत्र आहे. त्यामुळे येथून सिताफळाची निर्यात वाढावी, यासाठी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी, पणन मंडळाचे अधिकारी, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी ऑनलाइन बैठकीत विचारमंथन केले. 

पणन मंडळातर्फे या बैठकीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. जी. मुळे, कृषी पणन मंडळाचे निर्यात व्यवस्थापक सतीश वराडे, सहायक सरव्यवस्थापक देशांतर्गत व्यापार विकास विभागाचे मंगेश कदम, अंबाजोगाई केव्हीकेचे शास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र जोशी, केव्हीके सोलापूरचे डॉ. विकास भिसे, प्रभारी उपसरव्यवस्थापक संजय शेळके, फलोत्पादन विकास अधिकारी गणेश पाटील, कृषी व्यवसाय पणन तज्ज्ञ कुलदीप काळे आदी उपस्थित होते. 

पाटील यांनी सीताफळ निर्यात धोरण स्पष्ट केले. मॅग्नेट प्रकल्पामध्ये सीताफळ पिकाचा समावेश आहे. बीड येथे होत असलेल्या नियोजित सीताफळ प्रक्रिया प्रकल्पाबाबत माहिती दिली.

मुळे यांनी निर्यात वाढीसाठी कृषी विभागाकडून सुरू असलेल्या प्रयत्नाची माहिती दिली. मार्गदर्शनानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे तज्ज्ञांनी दिली. शेळके यांनी आभार मानले. कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार व सरव्यवस्थापक दीपक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली.


इतर ताज्या घडामोडी
शहरातील आठवडे बाजारांवर महापालिका...पुणे ः शेतकऱ्यांच्या शेतमालाला मध्यस्थाशिवाय थेट...
अखाद्य वस्तूंमुळे जनावरांना होणारे अपाय जनावरांना होणारे सर्वसामान्य संसर्गजन्य आजार हे...
परभणी जिल्ह्यात कृषी, पशुसंवर्धनासाठी...परभणी ः ‘‘परभणी जिल्हा परिषदेच्या यंदाच्या...
काबुली हरभऱ्याचा दर आठ हजार रुपयांवरजळगाव  ः  खानदेशात काबुली हरभऱ्याची आवक...
‘रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप...सातारा :  ‘‘या वर्षी चांगला पाऊस पडला....
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ...अकोला : इतर मागासप्रवर्गासाठी (ओबीसी) असलेल्या २७...
‘भरड धान्य खरेदी केंद्रांसाठी तातडीने...जळगाव  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात फक्त मका...
तापमानात वाढ होण्यास सुरुवातमार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रावरील...
तेलकट डाग रोग व्यवस्थापनाच्या सहा...तेलकट डाग रोग (बॅक्टेरियल ब्लाइट किंवा बीबीडी)...
‘जलयुक्त’च्या कामाची धारवाडी, चिचोंडीत...नगर : जलयुक्त शिवार अभियानातील तक्रारी असलेल्या...
अकोला जिल्हा परिषदेत ओबीसी सदस्यांवर...अकोला : इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) असलेल्या...
उत्तर सोलापुरात २३ गावांचे होणार...सोलापूर : ‘‘गावठाणातील जमिनींचे ड्रोनद्वारे...
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना...औरंगाबाद : ‘‘असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म अन्न...
खानदेशात जलसाठा मुबलक जळगाव : खानदेशात विविध प्रमुख सिंचन...
हरभरा दर सुधारल्याने नांदेडचे शेतकरी...नांदेड : ‘‘केंद्र शासनाच्या किमान हमी दरानुसार...
परभणी जिल्ह्यात तुती लागवडीसाठी ५८५...परभणी ः ‘‘महारेशीम अभियानांतर्गत रेशीम शेती...
साताऱ्यात ४३१ कुटुंबांच्या घराचे स्वप्न...कऱ्हाड : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी १००...
सामूहिक गट शेतीतील ऊस तोडणीस सुरुवात नाशिक : सटाणा तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीस...
परभणी जिल्ह्यातील हरभऱ्याचा पीकविमा...परभणी ः लिमला (ता. पूर्णा) तसेच परिसरात यंदा...
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी शासनाची...मुंबई : राज्यातील धुळे, नंदुरबार, नागपूर, अकोला,...