agriculture news in marathi, online crop insurance issue, nagar, maharashtra | Agrowon

नगरमध्ये पीकविमा आकड्यांबाबत प्रशासनालाच ताळमेळ जुळेना

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

पीकविमा भरण्याबाबत कृषी विभाग आणि प्रशासनाने शेतकऱ्यांमध्ये पाहिजे तेवढी जागृती केली नाही. त्यात अनेक वेळा पैसे भरल्यावर ज्या पिकाचे नुकसान होते त्या पिकाला मदत मिळत नाही. त्यामुळे शेतकरी पीकविम्यासाठी उत्सुक नसल्याचे दिसते. ज्या शेतकऱ्यांना विमा भरायचा आहे, त्यांना सातत्याने सर्व्हर डाउन होत असल्याने अडचणीला सामोरे जावे लागले. जागृती झाली असती तर अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा भरला असता.
- सतीश कुताळ, शेतकरी, पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा.

नगर   ः जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पीकविमा भरल्याचा आठ दिवसांपूर्वीचा आकडा प्रशासनाकडे उपलब्ध आहे. मात्र त्यानंतर किती लोकांना विमा भरला. ऑनलाइन, ऑफलाइन अर्ज किती आले? किती शेतकरी विम्यापासून वंचित राहणार याची माहिती कृषी विभागासह प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. मात्र गतवर्षीचा विचार करता यंदा किमान ५० हजार शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सर्व्हर सातत्याने बंद पडत असल्याने अडचणीत भर पडत असून आदेश   असूनही बॅंका ऑफलाइन अर्ज स्वीकारत नसल्याची स्थिती मंगळवारी (ता. ३१) होती. जिल्ह्यामध्ये ९ लाख १६ हजार ७२४ एकूण शेतकरी खातेदार आहेत. त्यातील साधारण साडेतीन ते चार लाख शेतकरी खरीप पीके घेणारे आहेत. यंदा खरीपासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची प्रशासनाकडे बुधवारपर्यंत (ता. २५) आकडेवारी उपलब्ध आहे. त्यानुसार ७५ हजार ३१७ शेतकऱ्यांनी ४९ हजार८३९ हेक्‍टरसाठी विमा हप्ता भरला आहे. मात्र त्यानंतर आठ दिवसांचा कालावधी उलटला. सर्व्हर सातत्याने डाऊन होत असल्याने दोन दिवसांपासून ऑफलाइन अर्ज  स्वीकारण्याची सवलत दिली आहे. त्यामुळे आजच्या स्थितीत नेमके किती लोकांनी विमा भरला याची माहिती प्रशासनाकडे नाही. उपलब्ध झाल्यावर देऊ, असे सांगितले जात आहे.

जिल्ह्यामध्ये खरिपात २०१५-१६ मध्ये १ लाख ४१ हजार २०६, २०१६-१७ मध्ये ३ लाख ८५ हजार ४२७, २०१७-१८ मध्ये २ लाख ५२ हजार ८९६ शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. जाणकारांच्या म्हणण्यानुसार यंदाची आकडेवारी अजून उपलब्ध होत नसली तरी सर्व्हर डाऊन आणि अन्य कारणाने साधारण ५० हजार शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे. ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यासही बॅंका टाळाटाळ करत असल्याचे शेतकरी सांगत होते.
 


इतर ताज्या घडामोडी
अकोले तालुक्यात भात लागवडीचे प्रमाण कमीचनगर  : अकोले तालुक्यात अद्यापपर्यंत जोरदार...
बियाणे उगवणीबाबत नगरमध्ये ७६८ तक्रारीनगर  ः सोयाबीन, बाजरीच्या निकृष्ट...
लोणावळा येथे सर्वाधिक पावसाची नोंदपुणे  ः पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागात...
मुंबई, ठाण्यात पावसाचा जोरमुंबई  : मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीत...
म्हैसाळ योजनेची दोन कोटींची पाणीपट्टी...सांगली  : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा कमी जोररत्नागिरी  ः जिल्ह्यात शनिवारी (ता.४) जोरदार...
भिवापुरी मिरचीच्या उत्पादकता वाढीसाठी...नागपूर  : भौगोलिक मानांकन मिळालेल्या आणि...
आधुनिक कृषी तंत्रज्ञान बांधापर्यंत...यवतमाळ : कृषीविषयक तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार...
महागाव तालुक्यात अल्प पावसामुळे पिकांची...अंबोडा, जि. यवतमाळ  ः महागाव तालुक्यात...
भंडारदरा परिसरात आढळला घोयरा सरडा अकोले, जि. नगर ः घोयरा सरडा अर्थातच श्यामेलिएओन...
खरिपातील धानाला देणार २५०० रुपयांचा दर...भंडारा  ः केंद्र सरकारकडून धानाला हमीभाव...
नांदेड जिल्ह्यात ८० टक्के क्षेत्रावर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात ६ लाख ८९५...
नांदेड जिल्ह्यात हरभऱ्याची सव्वा लाख...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
आर्क्टिक वनस्पती कर्ब शोषण्यापेक्षा...आर्क्टिक प्रदेशामध्ये वाढणाऱ्या उंच झाडे किंवा...
कोरडवाहू कपाशीचे लागवड नियोजनअयोग्य जमिनीवरील बीटी कपाशीची लागवड, लागवडीचे...
मराठवाड्यात पावसाचा जोर कमीऔरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत...
बियाण्यांच्या अडीच हजारांवर तक्रारींची...बीड : उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट...
नांदेड जिल्ह्यासाठी खरीप पीकविमा योजना...नांदेड : जिल्ह्यात यंदासाठी (२०२०-२१) खरीप हंगाम...
सततच्या खंडित वीजपुरवठ्याने माळीनगर...माळीनगर, जि. सोलापूर : वारंवार खंडित...