agriculture news in marathi Online exams are impossible in universities; Vice Chancellor committee report | Agrowon

विद्यापीठांत ऑनलाइन परीक्षा अशक्‍य; कुलगुरूंच्या समितीचा अहवाल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नेमलेल्या समितीने अहवाल सादर केला असून मुंबई, पुणे विद्यापीठ वगळता इतर विद्यापीठांत ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्‍य असल्याचे नमूद केले आहे.

मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नेमलेल्या समितीने अहवाल सादर केला असून मुंबई, पुणे विद्यापीठ वगळता इतर विद्यापीठांत ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्‍य असल्याचे नमूद केले आहे. समिती हा अहवाल आज (ता. ३१) राज्य सरकारकडे सादर करणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तसेच राज्यपालांसोबतही याविषयी तातडीने चर्चा करणार असल्याचे सामंत म्हणाले.

परीक्षेच्या आयोजनाबाबत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता.२९) समिती गठीत करण्यात आली होती. समितीने तयार केलेल्या अहवालावर रविवारी (ता. ३०) सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्वच विद्यापीठांनी ऑफलाईन परीक्षा घेणे कठीण असल्याचे मत या अहवालात नोंदविण्यात आले आहे. मुंबई आणि पुणे या दोन विद्यापीठांचा अपवाद वगळता राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये ऑनलाइन परीक्षा घेणे शक्‍य नाही. त्यासाठीची यंत्रणा विद्यापीठांमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे सर्व विद्यापीठांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल, अशी भीती कुलगुरूंनी या अहवालाच्या माध्यमातून व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.

ग्रामीण भागात परीक्षा कठीण
सर्वोच्च न्यायालयानेच अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे निर्देश दिल्याने या परीक्षा नेमक्‍या कोणत्या पद्धतीने घ्याव्यात, यावर उपाययोजना सुचविण्यासाठी कुलगुरूंची समिती नेमण्यात आली होती. मात्र, समितीने गेल्या काही महिन्यांत ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने या ठिकाणी ऑफलाइन परीक्षा घेणे कठीण असल्याचे अहवालात नमूद केले आहे.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
भारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...
मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...
सोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...