फळबाग व्यवस्थापनाबाबत आज ऑनलाइन शास्‍त्रज्ञ-शेतकरी संवाद  

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रातर्फे सोमवारी (ता. १३) सकाळी ११ ते १२ या वेळेत फळबाग व्यवस्थापन या विषयावर झुम क्‍लाउड मिटिंग (Zoom Cloud meeting) माध्यमाद्वारे ऑनलाइन शास्‍त्रज्ञ-शेतकरी संवाद आयोजित करण्‍यात आला आहे.
Online expert-farmer interaction today on Horticulture management

फळबाग व्यवस्थापन विषयावर विद्यापीठातील उद्यानविद्या महाविद्यालयातील फळबाग तज्ज्ञ डॉ. बी. एस. कलालबंडी हे मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी आपल्या मोबाइलवर झुम क्‍लाउड मिटिंग अॅप (zoom Cloud meeting app) डाउनलोड करावे लागेल. 

डाऊनलोड करण्यासाठी https://play.google.com/store/apps/details?id=us.zoom.videomeetings येथे क्लिक करा. त्यासाठी मिटिंग आयडी ६२०९६९५५९३ असून मिटिंग पासवर्ड kph४५६७ आहे. शेतकऱ्यांनी या तंत्रांची पूर्ण पडताळणी करूनच सहभागी व्हावे, असे आवाहन विस्तार कृषिविद्यावेत्ता डॉ. यू. एन. आळसे यांनी केले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com