Agriculture news in Marathi Online follow up of Gopinath Munde Farmer Accident Insurance scheme | Agrowon

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्याचा ऑनलाइन पाठपुरावा 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 एप्रिल 2020

नाशिक : ज्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला असेल त्यांना विमा हप्ता न भरता विमा भरपाई रक्कम गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत वारसदाराच्या खात्यात थेट जमा होते. मात्र, लॉकडाऊनमुळे कार्यालये बंद असल्याने अपघाताची माहिती कृषी विभागास वेळेवर देता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी या विमा योजनेसाठी विमा सल्लागार असलेल्या ‘जयका’ विमा सल्लागार कंपनीकडून ऑनलाइन स्वरूपात माहिती मागविण्यात येत आहे. 

नाशिक : ज्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला असेल त्यांना विमा हप्ता न भरता विमा भरपाई रक्कम गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत वारसदाराच्या खात्यात थेट जमा होते. मात्र, लॉकडाऊनमुळे कार्यालये बंद असल्याने अपघाताची माहिती कृषी विभागास वेळेवर देता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी या विमा योजनेसाठी विमा सल्लागार असलेल्या ‘जयका’ विमा सल्लागार कंपनीकडून ऑनलाइन स्वरूपात माहिती मागविण्यात येत आहे. 

प्राप्त माहितीच्या आधारे अपघातग्रस्त शेतकरी व त्याच्या वारसदारास विमासंबंधी येणाऱ्या अडचणी व त्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत असल्याची माहिती जयका विमा सल्लागार कंपनीचे ग्रामीण राज्य प्रकल्प प्रमुख डॉ. अभिजित आहेर यांनी दिली.

उपक्रमाच्या अनुषंगाने गूगल फॉर्म तयार करून देण्यात आला आहे. ज्यामध्ये अपघातग्रस्त शेतकरी किंवा वारसदाराचे नाव, पत्ता, अपघात दिनांक, यासह अपघाताचे कारण, स्वरूप त्यामध्ये मृत्यू किंवा अपंगत्व, दावा पूर्व करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, जमिनीची मालकी आदी आवश्यक बाबींची माहिती या फॉर्ममध्ये भरून घेतली जात आहे. या फॉर्मद्वारे माहिती प्राप्त झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला विमा सल्लागार कंपनीकडून फोनद्वारे त्यास मार्गदर्शन व पाठपुरावा करण्यासाठी आवश्यक माहिती त्यास दिली जात आहे. शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसदाराला रूपये २ लाख व कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास शेतकऱ्याला रुपये १ लाख इतकी रकमेची तरतूद या योजनेत आहे.

योजनेची स्थिती

  • आत्तापर्यंत राज्यभरातून २०० अर्ज प्राप्त
  • अर्ज प्राप्त झाल्यानंतर पुढील कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मार्गदर्शन
  • शेतकरी व त्यांच्या वारसदारांना अडचणी असल्यास फोनद्वारे समाधान

गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेसाठी सल्लागार म्हणून २ कंपनी काम करते. मात्र, लॉकडाऊन दरम्यान शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये. त्यांचे अर्ज प्रलंबित राहू नये व तात्काळ विमा कंपनीला माहिती दिली जावी. तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन होण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.
- डॉ. अभिजित आहेर, प्रकल्प प्रमुख (ग्रामीण), जयका विमा सल्लागार कंपनी


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...