Agriculture news in marathi Online guidance from Pandekrivi to vegetable growers | Agrowon

भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना ‘पंदेकृवि’कडून ऑनलाईन मार्गदर्शन 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 एप्रिल 2020

अकोला ः सद्यःस्थितीत शेती क्षेत्राला जबर फटका बसला आहे. या वाताहतीच्या केवळ नोंदी करण्यापेक्षा आता या संकटाला तोंड कसे द्यायचे, त्यातून मार्ग कसा काढायचा हा मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत सोमवारी (ता. २१) ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. २७ गावांतील शेतकरी या सुविधेत सहभागी झाले होते. 

अकोला ः सद्यःस्थितीत शेती क्षेत्राला जबर फटका बसला आहे. या वाताहतीच्या केवळ नोंदी करण्यापेक्षा आता या संकटाला तोंड कसे द्यायचे, त्यातून मार्ग कसा काढायचा हा मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत सोमवारी (ता. २१) ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. २७ गावांतील शेतकरी या सुविधेत सहभागी झाले होते. 

सध्याच्या ‘कोरोना’ विषाणूच्या परिस्थितीमध्ये भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मल्टिलोकेशन ऑडिओ सुविधेद्वारे दोन तास मार्गदर्शन करण्यात आले. उन्हाळ्यातील जमिनीची मशागत, मातीचे नमुने, प्रमुख पिकाच्या लागवडीची तयारी, भाजीपाला व्यवस्थापन, विविध पिकांच्या संशोधित जाती, कृषी उत्पन्न बाजार समिती व बाजारपेठ यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमाकरिता प्रमुख मार्गदर्शक म्हणून विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे तसेच भाजीपाला संशोधन केंद्राचे विभागप्रमुख डॉ. घावडे यांनी सहभागी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी फोनद्वारे त्यांचे शेती व्यवस्थापनासंदर्भातील प्रश्न विचारले. 

सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतीची कामे करीत असताना सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहे, असा सल्ला देण्यात आला. लॉकडाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला बाजारात आणायचा असल्यास पास सेवेसाठी तालुका कृषी विभागात संपर्क साधावा, असे सांगण्यात आले. 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...