Agriculture news in marathi Online guidance on pre-kharif season management | Agrowon

खरीपपूर्व हंगाम व्यवस्थापनाचे ऑनलाइन मार्गदर्शन 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 मे 2020

नाशिक : कोविड-१९ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व जमावबंदी असल्याने कृषी विज्ञान केंद्र मालेगाव, कृषी विभाग आणि आत्मा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून खरीपपूर्व हंगाम व्यवस्थापन संदर्भात शेतकरी बांधवाना फेसबुक लाईव्ह व झुम अॅपद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सोमवार (ता. ४) पासून हा उपक्रम सुरू झाला असून मंगळवार (ता. १४) पर्यंत विविध विषयांवर विषयनिहाय विशेषज्ञ मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख अमित पाटील यांनी दिली. 

नाशिक : कोविड-१९ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व जमावबंदी असल्याने कृषी विज्ञान केंद्र मालेगाव, कृषी विभाग आणि आत्मा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून खरीपपूर्व हंगाम व्यवस्थापन संदर्भात शेतकरी बांधवाना फेसबुक लाईव्ह व झुम अॅपद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सोमवार (ता. ४) पासून हा उपक्रम सुरू झाला असून मंगळवार (ता. १४) पर्यंत विविध विषयांवर विषयनिहाय विशेषज्ञ मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख अमित पाटील यांनी दिली. 

पहिल्या फेसबुक लाईव्हमध्ये सोमवारी (ता. ४) कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ रुपेश खेडकर यांनी शेतकरी बांधवांना खरीपपूर्व हंगाम व्यवस्थापन ज्यामध्ये उन्हाळ्यातील नांगरणी, वखरणी, शेणखत व कंपोस्टचा वापर, बी-बियाणे पूर्वनियोजन, बीज प्रक्रिया, लागवडीचे नियोजन, खत व्यवस्थापन, हिरवळीच्या पिकांचा वापर, आंतरपिकाचा समावेश, पिकांची फेरपालट, गुलाबी बोडअळी व लष्करी अळीच्या नियंत्रणाच्या उपाययोजना इत्यादी विषयी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. 

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शेतीमध्ये सामाजिक अंतर ठेवण्यासाठी मजुरांना ४ ते ६ फुट कामादरम्यान अंतर, मास्कचा वापर, जंतुनाशक-साबणाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाला १२० शेतकरी सहभागी झाले होते. बुधवारी (ता. ६) सकाळी १० वाजता फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परीस्थितीत शेतीचे नियोजन’ या विषयावर कृषी विज्ञान केंद्राच्या उद्यानविद्या विषयाचे विषय विशेषज्ञ पवन चौधरी मार्गदर्शन करणार आहेत. 

गुरुवारी (ता. ७) ‘उन्हाळ्यात जनावरांचे संगोपन व काळजी’ या विषयावर पशुविज्ञान व दुग्धव्यवसाय विषयाचे विषय विशेषज्ञ संदीप नेरकर हे मार्गदर्शन करतील. शुक्रवारी (ता. ८) सकाळी १० वाजता ‘खरीप-पूर्व हंगाम व्यवस्थापन’ उद्यानविद्या विषयाचे विषय विशेषज्ञ पवन चौधरी तर दुपारी १२ वाजता ‘जमीन आरोग्य व्यवस्थापन’ या विषयावर मृदशास्त्र विभागाचे विशेषज्ञ विजय शिंदे मार्गदर्शन करतील. शनिवारी (ता. ९) सकाळी ११:३० वाजता ‘कापूस पिकातील गुलाबी बोंडअळी’ या विषयावर उद्यानविद्या विषयाचे विषय विशेषज्ञ पवन चौधरी मार्गदर्शन करणार आहेत. 

शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करावा 
फेसबुक लाईव्ह, झुम व्हिडिओ कॉन्फरन्स या माध्यमांतून करण्यात येणाऱ्या तांत्रिक मार्गदर्शनाचा उपयोग घेऊन आगामी खरीप हंगामाचे नियोजन करावे. शेतकऱ्यांनी नियमित माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र मालेगावच्या https://www.facebook.com/kvkmalegaon१/ या पेजला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

झूमअॅप कॉन्फरन्सद्वारे प्रशिक्षण कार्यक्रम :
दिनांक वेळ विषय 
१० मे सकाळी -११:०० मका पिकातील लष्करीअळी व्यवस्थापन
११ मे सकाळी -११:०० शेडनेटमधील भाजीपाला लागवड
१२ मे दुपारी -१२:०० रासायनिक खतांचा संतुलित वापर
१४ मे सकाळी -१०:०० खरीप कांदा लागवड तंत्रज्ञान

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरवावा नगर ः राज्यात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
दूध, अंडी ः मानवी आहारासाठी उपयुक्तआपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते...
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...