कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा महोत्सव सुरू 

राज्य कृषी पणन मंडळाने आॅनालाइन आंबा महोत्सव सुरू केला आहे. याकरिता पणन मंडळाचे https://bs.msamb.com हे खरेदी-विक्रीकरिता ऑनलाइन पोर्टल कार्यरत करण्यात आलेले असून यावर आंबा उत्पादक तसेच ग्राहक नोंदणी करू शकतात.
Online Mango Festival launched by Agriculture Marketing Board
Online Mango Festival launched by Agriculture Marketing Board

पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या हापूस आणि केशर आंब्याला ग्राहक मिळावा आणि ग्राहकांना रास्त दरात दर्जेदार आंबा थेट घरी उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य कृषी पणन मंडळाने आॅनालाइन आंबा महोत्सव सुरू केला आहे. याकरिता पणन मंडळाचे https://bs.msamb.com हे खरेदी-विक्रीकरिता ऑनलाइन पोर्टल कार्यरत करण्यात आलेले असून यावर आंबा उत्पादक तसेच ग्राहक नोंदणी करू शकतात. या पोर्टलद्वारे गृहनिर्माण संस्थेमधील जास्तीत जास्त सभासदांनी एकत्रित नोंदणी केल्यास कोकणातील आंबा उत्पादकांना थेट सोसायटीमध्ये आंबा पुरविण्यात येणार आहे. 

याबाबत पणन मंडळाचे सरव्यवस्थापक दिपक शिंदे यांनी माहिती दिली. शिंदे म्हणाले, ‘‘पणन मंडळाच्या वतीने दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजने अंतर्गत आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची  संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा माल मिळावा हा उद्देश महोत्सवाचा असतो. मात्र, गेल्या दोन वर्षांचा कोरोना प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर थेट आंबा उत्पादक व ग्राहकांची भेट घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी मंडळामार्फत ऑनलाइन सुविधा देण्यात आली आहे. 

यावर्षी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यातील हापूस आंबा उत्पादकांबरोबरच मराठवाड्यातील केशर आंबा उत्पादकही सहभागी होणार आहेत. पणन मंडळाकडे कोकणातील बहुतांश आंबा उत्पादकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली असून आंबा विक्री सुरू झालेली आहे. यावर्षी मराठवाड्यातील महाकेशर संघाद्वारे मोठ्या प्रमाणावर राज्यातील केशर आंबा उत्पादकांना एकत्र आणले असून त्यांनीही पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.    गेल्यावर्षी ६५ हजार डझनची आॅनलाइन विक्री  गेल्यावर्षी सुमारे ६५ हजार डझन आंबा पोर्टलद्वारे विक्री करण्यात आलेला होता. तरी यावर्षीही ग्राहकांनी जास्तीत जास्त नोंदणी करून, दर्जेदार आंब्याची चव घ्यावी, असे आवाहन दीपक शिंदे यांनी केले आहे. तर अधिक माहितीसाठी सहायक सरव्यवस्थापक मंगेश कदम ( मोबाईल - ७५८८०२२२०१) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com