Agriculture news in marathi Online Mango Festival launched by Agriculture Marketing Board | Agrowon

कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा महोत्सव सुरू 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 एप्रिल 2021

राज्य कृषी पणन मंडळाने आॅनालाइन आंबा महोत्सव सुरू केला आहे. याकरिता पणन मंडळाचे https://bs.msamb.com हे खरेदी-विक्रीकरिता ऑनलाइन पोर्टल कार्यरत करण्यात आलेले असून यावर आंबा उत्पादक तसेच ग्राहक नोंदणी करू शकतात.

पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या हापूस आणि केशर आंब्याला ग्राहक मिळावा आणि ग्राहकांना रास्त दरात दर्जेदार आंबा थेट घरी उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य कृषी पणन मंडळाने आॅनालाइन आंबा महोत्सव सुरू केला आहे. याकरिता पणन मंडळाचे https://bs.msamb.com हे खरेदी-विक्रीकरिता ऑनलाइन पोर्टल कार्यरत करण्यात आलेले असून यावर आंबा उत्पादक तसेच ग्राहक नोंदणी करू शकतात. या पोर्टलद्वारे गृहनिर्माण संस्थेमधील जास्तीत जास्त सभासदांनी एकत्रित नोंदणी केल्यास कोकणातील आंबा उत्पादकांना थेट सोसायटीमध्ये आंबा पुरविण्यात येणार आहे. 

याबाबत पणन मंडळाचे सरव्यवस्थापक दिपक शिंदे यांनी माहिती दिली. शिंदे म्हणाले, ‘‘पणन मंडळाच्या वतीने दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजने अंतर्गत आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची 
संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा माल मिळावा हा उद्देश महोत्सवाचा असतो. मात्र, गेल्या दोन वर्षांचा कोरोना प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर थेट आंबा उत्पादक व ग्राहकांची भेट घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी मंडळामार्फत ऑनलाइन सुविधा देण्यात आली आहे. 

यावर्षी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यातील हापूस आंबा उत्पादकांबरोबरच मराठवाड्यातील केशर आंबा उत्पादकही सहभागी होणार आहेत. पणन मंडळाकडे कोकणातील बहुतांश आंबा उत्पादकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली असून आंबा विक्री सुरू झालेली आहे. यावर्षी मराठवाड्यातील महाकेशर संघाद्वारे मोठ्या प्रमाणावर राज्यातील केशर आंबा उत्पादकांना एकत्र आणले असून त्यांनीही पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 
 
गेल्यावर्षी ६५ हजार डझनची आॅनलाइन विक्री 
गेल्यावर्षी सुमारे ६५ हजार डझन आंबा पोर्टलद्वारे विक्री करण्यात आलेला होता. तरी यावर्षीही ग्राहकांनी जास्तीत जास्त नोंदणी करून, दर्जेदार आंब्याची चव घ्यावी, असे आवाहन दीपक शिंदे यांनी केले आहे. तर अधिक माहितीसाठी सहायक सरव्यवस्थापक मंगेश कदम ( मोबाईल - ७५८८०२२२०१) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...