शेतमालाचे पैसे थेट बॅँक खात्यांत; लासलगाव बाजार समितीत अंमलबजावणी सुरु

शेतमालाचे पैसे थेट बॅँक खात्यांत; लासलगाव बाजार समितीत अंमलबजावणी सुरु
शेतमालाचे पैसे थेट बॅँक खात्यांत; लासलगाव बाजार समितीत अंमलबजावणी सुरु

नाशिक : केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार बाजार समितीत विक्री होणाऱ्या शेतमालाची रक्कम १ सप्टेंबर २०१९ पासून शेतकरी वर्गाला रोख स्वरूपात देणे बंद करण्यात आले आहे. ‘आरटीजीएस’ व ‘एनईएफटी’ प्रणालीद्वारे बँक खात्यावर जमा होणार असल्याने व्यापारी, शेतकरी वर्गामध्ये द्विधामनःस्थिती दिसून येत आहे. ऑनलाइन पेमेंट पद्धतीला काही शेतकरी राजी असल्याचे तर काही शेतकऱ्यांमध्ये या कामकाजाबाबत नाराजी असल्याचे दिसून येते.  केंद्र शासनाच्या डिजिटल बँकिंग धोरणास चालना देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये शेतमाल विक्रीची रक्कम ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यासाठी कामकाज सुरू झाले आहे. व्यापा-यांनी चोवीस तासांच्या आत शेतमाल विक्रीचे पैसे शेतक-यांच्या बँक खात्यात वर्ग करणे यामध्ये बंधनकारक आहे. मात्र याबाबत अनेक शेतकऱ्यांमध्ये अनेक गैरसमज व संभ्रम आहे. त्यामुळे ही योजना जरी हिताची असली तरी काही शेतकऱ्यांचा यासाठी विरोध दिसून येतो आहे. 

शेतक-यांना बाजार समितीत शेतमाल वाहतुकीसाठी वाहनाचे भाडे, डिझेल खर्च, खरेदीसाठी लागणारी रक्कम यासाठी पैसे कुठून उपलब्ध करायचे ही प्रमुख अडचण आहे. तसेच व्यापारी वर्गाने वेळेवर बँकेत पैसे जमा न केल्यास पुन्हा चौकशीसाठी व्यापा-यांकडे हेलपाटे मारण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे त्यात बाजार समितीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मजुरी, वाहन भाडे आदी देण्यासाठी किमान काही रक्कम रोख स्वरूपात मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

पैसे कर्ज खात्यात वर्ग होण्याबाबत साशंकता अनेक शेतकऱ्यांच्या बँकांविषयी अनेक तक्रारी आहेत. तक्रारींचा विचार करता काही बँका पैसे खात्यात जमा झाल्यानंतर पैसे काढण्यास अडचणी करतात. तर काही बँका परस्पर कर्ज खात्यात पैसे वर्ग करतात, यामुळे आम्ही अडचणीत येऊ असे काही शेतकऱ्यांनी सांगितले. प्रमुख अडचणी 

  • अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते नाही
  • ऑनलाइन पद्धतीच्या प्रणालीबद्दल शेतकऱ्यांना माहितीचा अभाव
  • माहिती अद्ययावत करताना काही वेळा चुकल्याने रक्कम इतर खात्यात वर्ग 
  • संयुक्त बँक खात्यावर पैसे वर्ग होण्यास अडचण 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com