महावितरणतर्फे बिले भरण्यासाठी ऑनलाइनचा जागर

महावितरणतर्फे बिले भरण्यासाठी ऑनलाइनचा जागर
महावितरणतर्फे बिले भरण्यासाठी ऑनलाइनचा जागर

सोलापूर  : पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर या जिल्ह्यांतील वीजग्राहकांनी जास्तीत जास्त बिलांचा भरणा ऑनलाइन करण्यासाठी महावितरणने जागर सुरू केला आहे. विविध उपक्रमांद्वारे ऑनलाइनद्वारे वीजबिल भरण्याबाबतचे फायदे वीजग्राहकांना पटवून दिले जात आहेत. हा उपक्रम राबविण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिले आहेत.

वीजग्राहकांना घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी व त्यांच्या अत्याधुनिक जीवनशैलीशी सुसंगत ग्राहकसेवा देण्यासाठी महावितरणने www.mahadiscom.in ही वेबसाइट व मोबाईल ॲपच्या माध्यमातून सोय उपलब्ध केली आहे. ऑनलाइन वीजबिल भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरगुती किंवा इतर वीजबिलांचा भरणा फक्त ऑनलाइनद्वारे करण्याचे आवाहन केले आहे. तशा सूचनाही संबंधित कार्यालय प्रमुखांकडून पाठविल्या आहेत. याशिवाय महावितरणची सर्व ग्राहक सुविधा केंद्रे, तसेच वीजबिल भरणा केंद्रांत रांगेत असलेल्या वीजग्राहकांशी संवाद साधून मोबाईल ॲप, वेबसाइटद्वारे ऑनलाइन वीजबिल भरण्याच्या प्रक्रियेची व त्याच्या फायद्याची माहिती देण्यात येणार आहे.

धनादेशाद्वारे वीजबिल भरणाऱ्या वीजग्राहकांची प्रत्यक्ष भेट घेऊन वीजबिलाचा भरणा ऑनलाइनद्वारे करण्याचे आवाहन त्यांना करण्यात येणार आहे.  महावितरण ग्राहक संपर्क अभियानामार्फत ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा, इतर कार्यक्रम, आठवडे बाजार तसेच शहरी भागातील मोठ-मोठे घरगुती, व्यापारी संकुल आदी ठिकाणी महावितरण मोबाईल ॲप डाउनलोड करणे, ॲपद्वारे वीजबिल भरणा व इतर सेवांची माहिती देणे, मोबाईल क्रमांकाची नोंदणी याबाबत प्रात्यक्षिकांसह जनजागृती केली जाणार आहे.

ऑनलाइन वीजभरणा आता निःशुल्क क्रेडिट कार्ड वगळता महावितरणचे वीजबिल भरण्यासाठी ऑनलाइनचे उर्वरित सर्व पर्याय आता निःशुल्क करण्यात आले आहे. याआधी नेटबॅंकिंगचा अपवाद वगळता वीजबिलाचा ऑनलाइन भरणा करण्यासाठी ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारले जात होते. परंतु क्रेडिट कार्ड वगळता नेटबॅंकिंग, डेबिट कार्ड, कॅश कार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ऑनलाइनद्वारे होणारा वीजबिल भरणा आता निःशुल्क केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com