agriculture news in Marathi online problem in selling onion seed Maharashtra | Agrowon

विद्यापीठाच्या कांदा बियाणे विक्रीत ‘ऑनलाइन’ गोंधळ

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 जून 2021

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बियाणे विक्रीत सुलभता येण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ऑनलाइन कांदा बियाणे विक्री करण्याचा निर्णय घेतला.

नाशिक/नगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बियाणे विक्रीत सुलभता येण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ऑनलाइन कांदा बियाणे विक्री करण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी ऑनलाइन नोंदणीत अडचणी आल्यानंतर यंदा नोंदणी पद्धतीत आणि संगणक प्रणालीमध्ये सुधारणा केल्याचा दावा विद्यापीठाने केला. मात्र शुक्रवारी (ता.११) पहिल्याच दिवशी सर्व्हर बंद पडल्याने दिवसभर नोंदणीसाठी ताटकळत बसलेल्या शेतकऱ्यांची निराशा झाली. उद्यापासून (ता.१४) विक्री सुरू होईल, असे संकेतस्थळावर दाखविण्यात येत होते. 

मागील वर्षी बियाणे विक्री पोर्टलवर नोंदणी करून नंतर बँकेच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने पैसे भरून नोंदणी पूर्ण केली गेली. परंतु या वर्षी ई-कॉमर्स ऑनलाइन कंपन्यांप्रमाणेच ‘फुले ॲग्रो मार्ट पोर्टल’वर नोंदणी करून इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्डद्वारे पैसे भरून नोंदणी पूर्ण करता येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र याबाबत फक्त घोषणाच उरली. त्यामुळे कांदा बियाणे ऑनलाइन पद्धतीने विक्री करण्यात विद्यापीठ सलग दुसऱ्या वर्षी फेल ठरल्याचा सूर शेतकऱ्यांमध्ये आहे. 

बियाणे खरेदीसाठी नोंदणी करण्यासाठी शेतकरी सकाळी ९ वाजेपासून संकेतस्थळ उघडून बियाणे नोंदणी व खरेदी करण्यासाठी डोळे लावून बसले होते. मात्र पहिल्यांदा ११ वाजेनंतर सुरू होईल, पुन्हा दुपारी ३ वाजता सुरू होईल. असे संदेश संकेतस्थळावर झळकले. नंतर ४ वाजेदरम्यान ‘संगणक प्रणाली ऑनलाइन पेमेंटसह अधिक कार्यक्षम करण्याच्या हेतूने ऑनलाइन बुकिंग १४ जून रोजी ११ वाजेपासून सुरू होईल’, असा संदेश प्रदर्शित करत शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करण्यात आली. 

राज्यभरातील हजारो शेतकरी सकाळपासून प्रयत्न करत होते. मात्र नोंदणीसह खरेदी न झाल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. विद्यापीठाने ऑनलाइन पोर्टलची पूर्व तपासणी व कामकाज होण्याबाबत खातरजमा करून विक्रीला सुरुवात करायला हवी होती. या गोंधळाचा मानसिक त्रास शेतकऱ्यांना सोसावा लागला आहे. शेतकऱ्यांनी या कामकाजावर संताप व्यक्त केला. 

प्रतिक्रिया
एकीकडे बियाणे कमी उपलब्ध असल्याचे सांगत प्रतिकिलो मागे ५०० रुपये दर वाढले. त्यात असा गोंधळ शेतकऱ्यांसाठी अडचणींचा व वेळखाऊ ठरला आहे. शेतकरी विद्यापीठात अडचणी आल्यानंतर बियाणे विक्री संदर्भात फोन करत होते, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून १५०० रुपये प्रतिकिलोने विक्री करावी. 
- जयदीप भदाणे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना, नाशिक 

एकाच वेळी राज्यभरात हजारो शेतकरी बुकिंग करत होते. त्यामुळे सर्व्हरवर लोड आला. त्यामुळे अडचण निर्माण झाली. ७ क्विंटल बियाणे विक्री झाली. अजून २३ क्विंटल बियाणे शिल्लक आहे. पैसे व नोंदणी यात गोंधळ होऊ नये यासाठी अडचण सोडवून गैरसोय टाळली जाईल. बँकेच्या तज्ज्ञांना सोबत घेऊन कामकाज सुरू आहे. शेतकऱ्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. 
- डॉ. आनंद सोळंके, प्रमुख शास्त्रज्ञ, बियाणे विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात हलक्या पावसाची शक्यता पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. आज (ता. १६...
सोयाबीनचा उच्चांकी दर मिळतोय अत्यल्प...अकोला ः सध्या बाजारात सोयाबीनला कुठे दहा हजार,...
...तर ‘त्या’ नेत्यास एकरभर जमीन बक्षीस...कोल्हापूर : केंद्र व राज्य सरकारकडून एकरकमी...
पाणलोट चळवळीचे आधारवड फादर हर्मन बाखर...नगर ः महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी आयुष्‍य...
रब्बी हंगामात होणार ८४८३ शेतीशाळा पुणे ः रब्बी हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना...
सोयाबीन उत्पादकांनी टार्गेट ठेवूनच...पुणे : मध्य प्रदेशात सोयाबीनची आवक हळूहळू वाढत...
खानदेशात केळी दर स्थिरजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची आवक दिवसागणिक...
घोटभर पाणी बेतले मायलेकीच्या जिवावरउंडवडी, जि. पुणे :  पिण्यासाठी पाणी काढताना...
हरभरा पीक करणार यंदाही रब्बीचे नेतृत्व पुणे ः राज्यात खरीप हंगामात मुख्य पीक म्हणून...
मोसंबी, शेडनेटसह सेंद्रिय पद्धतीने...पारंपरिक मोसंबी बागेतील लागवड अंतर व वाणातील बदल...
‘कोरोना’नंतर आकार घेतेय फुलांची...गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे पुणे...
‘मामा’ तलाव रुतले गाळात साकोली, जि. भंडारा : भंडारा, गोंदिया जिल्ह्यांतील...
‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानातून संत्रा...नागपुरी संत्र्याची हेक्टरी उत्पादकता वाढण्यासाठी...
राज्यात उद्यापासून पावसाची उघडीप शक्यपुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस उद्यापासून (ता....
कीडनाशके साठ्यांच्या होणार संगणकीय नोंदीपुणे ः देशातील कीडनाशके विक्री करणाऱ्या दुकानात...
ई-पीक पाहणी ॲपमध्ये आंतरपीक नोंदणीला ‘...पथ्रोट, जि. अमरावती : शासनाच्या ई-पीक पाहणी...
मानवाधिकार आयोगाची शेतकरी आंदोलनावरून...नवी दिल्ली ः राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (...
ई-पीक पाहणीबाबत काही भागांतून तक्रारीपुणे ः आपल्या शेतातील पिकाची नोंद स्वतः...
पालघर, नाशिकमध्ये मुसळधारपुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात अनेक...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारापुणे : पोषक हवामानामुळे राज्यात सर्वदूर पावसाचा...