agriculture news in Marathi online problem in selling onion seed Maharashtra | Page 3 ||| Agrowon

विद्यापीठाच्या कांदा बियाणे विक्रीत ‘ऑनलाइन’ गोंधळ

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 जून 2021

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बियाणे विक्रीत सुलभता येण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ऑनलाइन कांदा बियाणे विक्री करण्याचा निर्णय घेतला.

नाशिक/नगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बियाणे विक्रीत सुलभता येण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ऑनलाइन कांदा बियाणे विक्री करण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी ऑनलाइन नोंदणीत अडचणी आल्यानंतर यंदा नोंदणी पद्धतीत आणि संगणक प्रणालीमध्ये सुधारणा केल्याचा दावा विद्यापीठाने केला. मात्र शुक्रवारी (ता.११) पहिल्याच दिवशी सर्व्हर बंद पडल्याने दिवसभर नोंदणीसाठी ताटकळत बसलेल्या शेतकऱ्यांची निराशा झाली. उद्यापासून (ता.१४) विक्री सुरू होईल, असे संकेतस्थळावर दाखविण्यात येत होते. 

मागील वर्षी बियाणे विक्री पोर्टलवर नोंदणी करून नंतर बँकेच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने पैसे भरून नोंदणी पूर्ण केली गेली. परंतु या वर्षी ई-कॉमर्स ऑनलाइन कंपन्यांप्रमाणेच ‘फुले ॲग्रो मार्ट पोर्टल’वर नोंदणी करून इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्डद्वारे पैसे भरून नोंदणी पूर्ण करता येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र याबाबत फक्त घोषणाच उरली. त्यामुळे कांदा बियाणे ऑनलाइन पद्धतीने विक्री करण्यात विद्यापीठ सलग दुसऱ्या वर्षी फेल ठरल्याचा सूर शेतकऱ्यांमध्ये आहे. 

बियाणे खरेदीसाठी नोंदणी करण्यासाठी शेतकरी सकाळी ९ वाजेपासून संकेतस्थळ उघडून बियाणे नोंदणी व खरेदी करण्यासाठी डोळे लावून बसले होते. मात्र पहिल्यांदा ११ वाजेनंतर सुरू होईल, पुन्हा दुपारी ३ वाजता सुरू होईल. असे संदेश संकेतस्थळावर झळकले. नंतर ४ वाजेदरम्यान ‘संगणक प्रणाली ऑनलाइन पेमेंटसह अधिक कार्यक्षम करण्याच्या हेतूने ऑनलाइन बुकिंग १४ जून रोजी ११ वाजेपासून सुरू होईल’, असा संदेश प्रदर्शित करत शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करण्यात आली. 

राज्यभरातील हजारो शेतकरी सकाळपासून प्रयत्न करत होते. मात्र नोंदणीसह खरेदी न झाल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. विद्यापीठाने ऑनलाइन पोर्टलची पूर्व तपासणी व कामकाज होण्याबाबत खातरजमा करून विक्रीला सुरुवात करायला हवी होती. या गोंधळाचा मानसिक त्रास शेतकऱ्यांना सोसावा लागला आहे. शेतकऱ्यांनी या कामकाजावर संताप व्यक्त केला. 

प्रतिक्रिया
एकीकडे बियाणे कमी उपलब्ध असल्याचे सांगत प्रतिकिलो मागे ५०० रुपये दर वाढले. त्यात असा गोंधळ शेतकऱ्यांसाठी अडचणींचा व वेळखाऊ ठरला आहे. शेतकरी विद्यापीठात अडचणी आल्यानंतर बियाणे विक्री संदर्भात फोन करत होते, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून १५०० रुपये प्रतिकिलोने विक्री करावी. 
- जयदीप भदाणे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना, नाशिक 

एकाच वेळी राज्यभरात हजारो शेतकरी बुकिंग करत होते. त्यामुळे सर्व्हरवर लोड आला. त्यामुळे अडचण निर्माण झाली. ७ क्विंटल बियाणे विक्री झाली. अजून २३ क्विंटल बियाणे शिल्लक आहे. पैसे व नोंदणी यात गोंधळ होऊ नये यासाठी अडचण सोडवून गैरसोय टाळली जाईल. बँकेच्या तज्ज्ञांना सोबत घेऊन कामकाज सुरू आहे. शेतकऱ्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. 
- डॉ. आनंद सोळंके, प्रमुख शास्त्रज्ञ, बियाणे विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ 


इतर अॅग्रो विशेष
केंद्राच्या निर्य़ातीनंतर सोयाबीनच्या...पुणे : केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात...
ऱाज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : राज्यात पावसाचा जोर वाढण्यास पोषक हवामान...
तेल कंपन्याही उभारणार बारा इथेनॉल...कोल्हापूर : इंधनामध्ये वीस टक्के इथेनॉल मिश्रणाचे...
सीताफळात अर्ली छाटणीच्या प्रयोगाचा झाला...सोलापूर ः जूनमध्ये होणारी फळछाटणी मार्चमध्येच...
पीकविमा कंपनीच्या बाबतीत देशभर बोंब :...नांदेड : जिल्ह्यातील ८१ महसूल मंडळांत अतिवृष्टी...
पूरक उद्योगातून गटाने तयार केली ओळखदेवनाळ (ता. जत, जि. सांगली) गावातील उपक्रमशील...
कुक्कुटपालन, पोषण बागेतून प्रगती न्यू राजापूर (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील २४...
पीक नुकसानीच्या साडेपाच लाख पूर्वसूचना...पुणे ः राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे चालू खरिपात...
साखर कामगारांना १२ टक्के वेतनवाढपुणे ः साखर कामगारांना प्रचलित वेतनात १२ टक्के...
कोकण, पूर्व विदर्भात अधिक पावसाचा अंदाजपुणे : राज्यात गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाने...
केळी निर्यातीत ‘सुरचिता’चे पदार्पण करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुरचिता ॲ...
खारपाणपट्ट्यात फुलवली प्रयोगशील...सांगवी मोहाडी (ता.. जि.. अकोला) येथील मनोहर...
जे जे अमंगल, ते नष्ट होवो ः मुख्यमंत्री...मुंबई : ‘जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो’ अशी...
खाद्यतेल, तेलबियांचा साठा जाहीर करानवी दिल्ली : देशात खाद्यतेलाचे दर वाढल्यानंतर...
विमा कंपनीला नुकसानीची सूचना देण्यासाठी...औरंगाबाद : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त...
महाराष्ट्र बियाणे उत्पादक संघाची स्थापनापुणे ः राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आता ‘...
विमा कंपनीच्या शिक्क्याशिवाय पावती...परभणी ः जिल्ह्यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांनी विमा...
कोकणात जोरदार पावसाचा अंदाजपुणे : राज्यात गेले काही दिवस धुमाकूळ घालणाऱ्या...
शेतीमाल निर्यातीचे राज्यात वीस समूहपुणे : केंद्रीय कृषी निर्यात धोरणातील उद्दिष्टे...
पाऊस ओसरला, काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाचा जोर ओसरला...