agriculture news in Marathi online raisin auction will be start soon Maharashtra | Agrowon

सांगली: ऑनलाइन बेदाणा सौदे लवकरच सुरु 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 मे 2020

हळदीपाठोपाठ बेदाण्याचेही ऑनलाइन सौदे सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याबाबत प्राथमिक बैठक घेवून चर्चा करण्यात आली.

सांगली: हळदीपाठोपाठ बेदाण्याचेही ऑनलाइन सौदे सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याबाबत प्राथमिक बैठक घेवून चर्चा करण्यात आली. बुधवारी (ता. ६) बेदाण्याचे सौदे सुरू करण्याबाबत बाजार समिती व्यापारी जिल्हा उपनिबंधक यांच्यात बैठक घेणार आहे. पुढील आठवड्यात बेदाण्याचे ऑनलाईन सौदे सुरू होण्याची शक्यता असल्याचे सभापती दिनकर पाटील यांनी सांगितले. 

बाजार समितीमध्ये ऑनलाइन बेदाणा सौदे काढण्याबाबत प्रशासन आणि व्यापारी यांच्यात बैठक झाली. यावेळी जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, बेदाणा व्यापारी राजेंद्र कुंभार, शितल पाटील, सुशिल हडदरे आदी उपस्थित होते. लॉकडाऊनमुळे मार्केट यार्डातील सौदे महिनाभर बंद होते.

सौदे बंद राहील्याने बाजारपेठेवर मोठा परिणाम होत होता. शिवाय शेतकऱ्यांसमोरही अडचणी निर्माण झाल्या होत्या. हळद व बेदाण्याची विक्री थांबली होती. सौदे लवकर सुरू झाले नाहीत, तर अडचणी वाढणार होत्या. एकाच वेळी मोठी आवक झाली तर मालाचे हळद व बेदाण्याचे दर पडण्याची भिती होती. त्यामुळेच जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी ऑनलाइन सौदे सुरू करण्याचे आदेश दिले.

मागील आठवड्यात मार्केट यार्डात हळदीचे ऑनलाइन सौदे सुरू करण्यात आले आहेत, त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने बेदाण्याचे ऑनलाईन सौदे काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. 

त्यामध्ये संभाव्य अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. बुधवारी बाजार समितीत याबाबत सविस्तर बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अडचणी कोणत्या आहेत, कोणत्या अडचणी येऊ शकतात यावर चर्चा करून धोरण ठरविण्यात येणार आहे. त्यानंतर ऑनलाइन बेदाणे सौदे सुरू करण्याबाबत प्रक्रिया सुरू केली जाईल. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून पुढील आठवड्यात बेदाण्याचे ऑनलाइन सौदे सुरू करण्याचा प्रयत्न करण्याचे निश्चित करण्यात आले. 


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...