Agriculture news in marathi Online registration of 800 farmers for sale of tur | Agrowon

जळगाव जिल्ह्यात तूर विक्रीबाबत ८०० शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

जळगाव  ः जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीने ज्वारीसह अनेक पिकांचे नुकसान झाले. मात्र, तुरीचे उत्पादन बऱ्यापैकी आहे. शासकीय तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. आत्तापर्यंत सुमारे ८०० शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. दरम्यान, ऑनलाइन नोंदणीसाठी १५ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 

जळगाव  ः जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीने ज्वारीसह अनेक पिकांचे नुकसान झाले. मात्र, तुरीचे उत्पादन बऱ्यापैकी आहे. शासकीय तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. आत्तापर्यंत सुमारे ८०० शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. दरम्यान, ऑनलाइन नोंदणीसाठी १५ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 

जिल्ह्यात जळगाव, चोपडा, अमळनेर, रावेर, मुक्ताईनगर, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, जामनेर, भुसावळ येथे तूर खरेदी केली जाईल. तुरीला ५८०० रुपये प्रतिक्विंटल असा दर शासकीय खरेदी केंद्रात दिला जाणार आहे. बाजारात यापेक्षा दर कमी असल्याने अनेक शेतकरी खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. जसे ज्वारी व मका खरेदीबाबत दिरंगाई, अनास्था असे प्रकार घडले, तसे तुरीबाबत करू नका, लवकर खरेदी सुरू करा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

जिल्ह्यात यंदा १४० टक्के पाऊस झाला. ऐन दिवाळीत झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कापसासह ज्वारी, मका इतर पिकांचे नुकसान झाले. ज्वारीला कणसे लागून काढणीवर आली होती. अनेकांनी ज्वारी, मका काढून ठेवला. मात्र, अतिवृष्टीने शेतातील ज्वारी काळी पडली. काढून ठेवलेल्या ज्वारी, मक्‍यात ओल निर्माण होऊन बुरशी आली. त्यानंतर शासकीय धान्य खरेदी सुरू झाली. मात्र, त्यावर चांगल्या दर्जाचा माल घेतला जाईल, असे स्पष्ट केले गेले. काळ्या धान्याबाबत ना अधिकारी बोलले ना लोकप्रतिनिधी. यामुळे काळी ज्वारी शेतकऱ्यांकडे तशीच पडून राहिली. केंद्रे सुरू झाल्यानंतर काळी ज्वारी केंद्रावर नाकारली जाईल. यामुळे शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केलीच नाही. ज्यांची चांगली ज्वारी होती, अशा केवळ ४०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली. मक्‍याची १४० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.


इतर ताज्या घडामोडी
पुणे विभागात खरीप कांद्याची ४० हजार...पुणे ः खरिपात अति पावसामुळे कांद्याचे नुकसान...
सोलापूर जिल्ह्यात पीक विमा नुकसान...सोलापूर : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
नुकसान भरपाई देण्यास सरकार कटिबद्ध :...औरंगाबाद  : ‘‘आता झालेल्या पावसाने...
कांदा बियाणे मिळवण्यासाठी अकोल्यात...अकोला ः रब्बी कांदा लागवडीची लगबग सुरु झाली...
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा...लातूर ः या वर्षी सुरवतीपासून चांगला पाऊस होत...
जळगाव जिल्ह्यात मक्याची ९० हजार...जळगाव  ः खानदेशात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा...
आजरा तालुक्‍यात भात कापणी सुरूआजरा, जि. कोल्हापूर ः आजरा तालुक्‍यात भात...
कारखानदारांना वाढत्या साखर साठ्याची...मुंबई  : राज्यात गेल्या गाळप हंगामातील ७२...
धानावरील तुडतुड्यांचे वेळीच व्यवस्थापन...नागपूर  : ‘‘सद्यास्थितीत पूर्व विदर्भात...
‘बाभळी’तील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न...नांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीकविम्यासाठी कंपनीकडे...नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पुराच्या...
जायकवाडी प्रकल्पातून ५५ टीएमसी पाण्याचा...औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून गत २५...
सांगली जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन...सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा...
आता खुल्या मिठाईवरही ‘वापर कालावधी’...नागपूर  : मिठाईच्या दुकानातील ‘ट्रे’ वर...
कुलगुरू निवड निकषांबाबत प्र-कुलपतींच्या...पुणे : कुलगुरू निवड निकषांच्या बदलाबाबत कुलपती...
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांना...मुंबई : विदर्भातील पुरापाठोपाठ मराठवाड्यातील...
कापूस खरेदीचे प्रभावी नियोजन करावे ः...मुंबई : आगामी हंगामामध्ये राज्यात सुमारे ४५० लाख...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यान्वित...मुंबई : लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार...
सीमाभागातील साखर कारखान्यांचे मजूर...कोल्हापूर : जिल्ह्यात ऊस तोडणी मजुरांचे आगमन होत...
जळगावात उडदाला ७५०० रुपये क्विंटल दरजळगाव  ः एकीकडे अतिपावसाने उडदाचे मोठे...