हमीभावाने कडधान्य विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीची मुदत संपली

हमीभावाने कडधान्य विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीची मुदत संपली
हमीभावाने कडधान्य विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीची मुदत संपली

जळगाव ः उडीद, मुगाची शासकीय खरेदी केंद्रांत विक्रीसंबंधी शेतकऱ्यांना आवश्‍यक ऑनलाइन नोंदणीची मुदत मंगळवारी (ता. १५) संपली आहे. जिल्ह्यात उडदाच्या विक्रीसंबंधी शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळाला. नोंदणीबाबत मुदतवाढीचे नवे आदेश बुधवारी (ता. १६) सकाळपर्यंत प्राप्त झालेले नव्हते.

नोंदणीची मुदत संपल्याने शेतकऱ्यांना उडीद, मूग विक्रीसंबंधी ऑनलाइन नोंदणी निर्देशीत केंद्रात करता येणार नाही. जिल्ह्यात पाचोरा येथे भडगाव शेतकरी सहकारी संघ, अमळनेर येथे शेतकरी संघ व जळगाव येथे जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची खरेदीसंबंधी सबएजंट म्हणून मार्केटिंग फेडरेशनने नियुक्ती केली आहे. 

या संस्थांमध्ये ऑनलाइन नोंदणी सुरू होती. मूग विक्रीसंबंधी जिल्ह्यात सुमारे ११००, तर उडीद विक्रीसंबंधी सुमारे ३२५ शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.  उडीद विक्रीबाबत फारसा प्रतिसाद नोंदणीला मिळालेला नाही. तर मूग विक्रीबाबतही मागील वर्षाच्या तुलनेत प्रतिसाद मिळालेला नाही. उडदाचे जिल्ह्यात सर्वत्र ७० टक्‍क्‍यांवर अतिपावसाने नुकसान झाले. यामुळे उडदाचा दर्जा घसरला आहे. 

बाजारात उडदाचे दर दबावात असतानादेखील शासकीय नोंदणीला प्रतिसाद न मिळाल्याने फारशी उडदाची खरेदीदेखील शासकीय केंद्रात होणार नाही, हेदेखील स्पष्ट झाले आहे. मूग विक्रीबाबत अमळनेर येथील केंद्रात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तर पाचोरा येथेही बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले. सोयाबीन विक्रीसंबंधीची नोंदणी आणखी सुरू राहणार आहे. ती ३१ ऑक्‍टोबर रोजी संपणार आहे.

मूग व उडीद विक्रीसंबंधी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करायची होती. त्याची मुदत संपली आहे. मुदतवाढीचे आदेश प्राप्त झालेले नाहीत. नोंदणीला मुदतवाढ मिळाली, तर तशी माहिती लागलीच जारी केली जाईल.  - परिमल साळुंखे, पणन अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com