जळगाव : हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू

हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू
हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू

जळगाव  ः जिल्ह्यात हरभऱ्याची शासकीय खरेदी सुरू करण्यासंबंधी प्रशासनाने तयारी सुरू केली असून, खरेदीसाठी १२ केंद्र निश्‍चित करण्यात येणार आहेत. ४८७५ रुपये प्रतिक्विंटलचा दर शेतकऱ्यांना दिला जाईल, अशी माहिती आहे.  सध्या तूर खरेदी १० केंद्रांमध्ये सुरू आहे. या १० केंद्रांसह पारोळा व यावल येथे हरभरा खरेदी सुरू करण्यासंबंधी प्रशासन तयारी करीत आहे. हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी संबंधित केंद्रात करून घ्यावी लागणार आहे. ही नोंदणी बुधवारपासून (ता. ११) १० केंद्रांमध्ये सुरू झाल्याचा दावा मार्केटिंग फेडरेशनमधील सूत्रांनी केला.  हरभरा खरेदीसाठी पारोळा, यावलसह जळगाव, अमळनेर, भडगाव, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, रावेर, चोपडा येथे खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहेत.  सध्या बाजारात हरभऱ्याचे दर ४००० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. हरभऱ्याची मळणी अनेक भागात सुरू झाली आहे. काबुली हरभऱ्याचे दर ५५०० रुपयांपर्यंत आहेत. शासकीय खरेदीमध्ये काबुली हरभऱ्याचीदेखील खरेदी केली जाणार आहे. पुढे मळणीला गती येईल. बाजारात हरभऱ्याची आवक वाढेल. यामुळे दरांवर दबाव येऊ शकतो. शेतकऱ्यांचे नुकसान होईल. यंदा हरभऱ्याची पेरणी जिल्ह्यात विक्रमी म्हणजेच सुमारे सव्वालाख हेक्‍टरवर झाली आहे. यामुळे शासकीय  हरभरा खरेदी लवकर सुरू करण्यासंबंधी कार्यवाही करावी, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com