सांगलीत मूग, उडीद खरेदीची ऑनलाईन नोंदणी सुरु

सांगलीः खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने मूग व उडीद खरेदीसाठीची नोंदणी सुरु झाली आहे.
Online registration for purchase of green gram and urad started in Sangli
Online registration for purchase of green gram and urad started in Sangli

सांगली ः खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने मूग व उडीद खरेदीसाठीची नोंदणी सुरु झाली आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन सरकारने केले आहे. सांगलीतील बाजार समिती आवारात केंद्र सुरु करण्याच्या हालचाली सुरु आहेत. 

केंद्र शासनाने प्रती क्विंटलप्रमाणे उडदासाठी सहा हजार, मुगासाठी सात हजार १९६ असा दर जाहीर केला आहे. चालू हंगामात मूग, उडदाची आवक बाजारात सुरु झाली आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी खरेदी केंद्र लवकरच सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. खरेदी केंद्रांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी नोंदणी ऑनलाइन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 

नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार उडीद, मूग खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळवण्यात येणार आहे. ज्या केंद्रावर नोंदणी केली आहे, त्याच केंद्रांवर एसएमएस आल्यानंतरच शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन यावा. सर्व खरेदी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

शेतकऱ्यांनी आपआपल्या तालुक्‍यातील खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. नोंदणीसाठी आधारकार्डाची छायांकिंत प्रत आणि पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा सादर करावा. शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर खरेदी केंद्रावर नोंदवावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com