agriculture news in marathi, Online registration of turnkey turnover today | Agrowon

जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंद
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 एप्रिल 2019

जळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून केंद्र सुरू झाली नाहीत. नोंदणी मंगळवारपर्यंत (ता. २३) करण्याचे आदेश होते. परंतु, मतदानामुळे ऑनलाइन नोंदणी करून घेणाऱ्या केंद्रांची कार्यालये बंद राहतील. त्यामुळे आज कुठलीही ऑनलाइन नोंदणी होणार नसल्याची माहिती मिळाली. 

जळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून केंद्र सुरू झाली नाहीत. नोंदणी मंगळवारपर्यंत (ता. २३) करण्याचे आदेश होते. परंतु, मतदानामुळे ऑनलाइन नोंदणी करून घेणाऱ्या केंद्रांची कार्यालये बंद राहतील. त्यामुळे आज कुठलीही ऑनलाइन नोंदणी होणार नसल्याची माहिती मिळाली. 

हरभरा खरेदीची तयारी मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात सुरू आहे. बाजारात देशी हरभऱ्याचे दर हमीभावापेक्षा २०० ते ४०० रुपयांनी कमी आहेत. मागील महिन्यात तर दर ३८०० ते ३९०० रुपयांपर्यंत होते. शासकीय केंद्रांमध्ये फक्त देशी हरभऱ्याची ४६२० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करण्याचे नियोजन प्रशासनाने केले. नऊ केंद्र त्यासाठी मंजूर अाहेत. त्यात पाचोरा, अमळनेर, चाळीसगाव, जामनेर, जळगाव, मुक्ताईनगर, बोदवड, रावेर, यावल या केंद्रांचा समावेश आहे. यातील सर्व केंद्रांमध्ये हरभरा विक्रीसाठी सुमारे १२०० शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली. अनेक शेतकरी उधारीवर हरभरा विक्री न करण्याच्या विचारात अाहेत. त्यांनी नोंदणीच टाळल्याचे सांगितले जात आहे. 

ऑनलाइन नोंदणी करून घेण्याची मुदत आटोपताच खरेदी सुरू करण्याचे निर्देश होते. मात्र, निवडणुकीमुळे नोंदणी बंद राहील. एक दिवस नोंदणीसाठी कमी मिळणार असल्याचे समोर आले आहे. यामुळे येत्या बुधवारी (ता. २४) हरभरा खरेदी कमाल केंद्रांमध्ये सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले. 

जळगाव येथे हरभरा खरेदीसाठी सबएजंट म्हणून मार्केटिंग फेडरेशनने कृषी औद्योगिक बहुउद्देशीय संस्थेची नेमणूक केली. या संस्थेच्या जळगाव येथील कार्यालयात सुमारे १०० शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली. यातील ३० शेतकऱ्यांना बुधवारी हरभरा विक्रीसाठी केंद्रात आणण्याचे संदेश सोमवारी पाठविण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
उत्तर भारतात अतिदक्षतेचा इशारा; नद्या...नवी दिल्ली : दक्षिण भारतानंतर आता उत्तर भारतही...