मराठवाडा पाणी परिषदेचे शनिवारी ऑनलाइन आयोजन 

लॉकडाउनमुळे मराठवाडा पाणी परिषदेची पहिली पाणी परिषद शनिवारी (ता. ३०) फेसबूक लाईव्ह च्या माध्यमातून होत आहे. ही पाणी परिषद दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी एकात्मिक जलनीती या मुख्य संकल्पनेवर होत आहे.
मराठवाडा पाणी परिषदेचे शनिवारी ऑनलाइन आयोजन 
मराठवाडा पाणी परिषदेचे शनिवारी ऑनलाइन आयोजन 

औरंगाबाद: लॉकडाउनमुळे मराठवाडा पाणी परिषदेची पहिली पाणी परिषद शनिवारी (ता. ३०) फेसबूक लाईव्ह च्या माध्यमातून होत आहे. ही पाणी परिषद दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी एकात्मिक जलनीती या मुख्य संकल्पनेवर होत आहे. 

२०१२ पासून सततच्या दुष्काळामुळे मराठवाड्याचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. पाण्याअभावी आरोग्य, शिक्षण, रोजगार, पशुधन ,पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई इत्यादी प्रश्न निर्माण झाले आहेत. या विविध प्रश्नांच्या दृष्टचक्रामुळे शेतकरी आत्महत्या पर्यंत या समस्येने उग्र स्वरूप धारण केले असून पाण्याअभावी मराठवाड्याचे वाळवंटीकरण होत आहे. या प्रश्नावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी मराठवाडा पाणी परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. पाणी परिषदेने आजतागायत दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी स्वतंत्र जलसंधारण आयुक्तालयाची औरंगाबादला स्थापना, गोदावरी खोरे व राज्याचा एकात्मिक जल आराखडा, कोकणातील पश्चिम वाहिनी नदी चे पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्यात वळविणे, शेतकऱ्यांना ठिबक साठी ८० टक्के अनुदान, गारपीट व दुष्काळामुळे शेतमालाचे झालेले नुकसान, त्याचे पंचनामे करून नुकसानभरपाई देणे यासाठी शासनाकडे आग्रह धरलेला होता. यातील बहुतांश प्रश्न परिषदेच्या प्रयत्नामुळे मार्गी लागलेले आहेत. या पाणी परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे प्रमुख पाच मागण्यांची मागणी करण्यात येणार आहे. 

या मागण्या मान्य झाल्यास मराठवाड्याचे सिंचनक्षेत्र ५४ टक्क्यांपर्यंत वाढवून मराठवाड्याची ग्रामीण अर्थव्यवस्था काही हजार कोटी ने सुधारणार आहे. यावर माजी जलसंधारण व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व विधान परिषदेचे सदस्य अंबादास दानवे व जलक्षेत्रातील अनेक मान्यवर आपणास मार्गदर्शन करणार आहेत. ३० मे रोजी अकरा ते चार या वेळात फेसबुक लाईव्ह पाणी परिषदेत https://www.facebook.com/GramvikasSanstha१/YouTube:Gramvikas SANSTHA Aurangabad लिंकद्वारे सहभागी व्हावे व इतरांना ही माहिती द्यावी, असे आवाहन मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे, उपाध्यक्ष मनोहर सरोदे, सचिव नवनाथ पवार यांनी केले आहे. 

या आहेत मागण्या व परिषदेचे चर्चेचे विषय 

  • दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी एकात्मिक जलनितीचा स्वीकार करून, जिल्हा व तालुका निहाय सिंचन विषयक प्लान तयार करून प्रभावी अंमलबजावणी करावी. 
  • मराठड्यातील प्रगतीपथावरील ५१ बंधारे पूर्ण करण्याकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा . 
  • आंतर खोरे पाणी परिवहन अंतर्गत कोकण, कृष्णा खोरे, पैनगंगा खोऱ्यातील अतिरिक्त पाणी दुष्काळी मराठाड्याकडे वळविणे. - कोल्हापुरी बंधारे ,पाझर तलाव, कालवे याची दुरुस्ती करून ,ठिबकचे ८० टक्के अनुदान शेतकऱ्यांना त्वरित उपलब्ध करून द्यावे. 
  • शेतीमालाला वाढीव हमीभाव व कोरोना लाॅकडाऊनमुळे नुकसान झालेल्या शेतमालाची नुकसान भरपाई त्वरित द्यावी. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com