agriculture news in marathi online zoom tranning for pomegranate farming from 21st April | Page 2 ||| Agrowon

डाळिंब पिकाचे २१पासून ऑनलाइन प्रशिक्षण

ॲग्रोवन वृत्तसेवा
शनिवार, 17 एप्रिल 2021

२१ ते २३ एप्रिल दरम्यान तीन दिवसीय डाळिंब पीक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाइन झूम मिटिंगच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.

औरंगाबाद : येथील कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड व राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र (सोलापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २३ एप्रिल दरम्यान तीन दिवसीय डाळिंब पीक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाइन झूम मिटिंगच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.

या ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमात आपणास विविध विषयांवर शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी कुलगुरू डॉ.ए.एस.ढवण राहतील. या प्रशिक्षणाला प्रमुख अतिथी म्हणून आयसीएआर-अटारी, पुणेचे संचालक डॉ.लाखन सिंग आयसीएआर-एनआरसीपी, सोलापूरच्या संचालक डॉ.ज्योत्सना शर्मा, ‘वनामकृवि’चे संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी. बी. देवसरकर, औरंगाबादचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. टी. एस .मोटे आदींची उपस्थिती राहणार आहे. 

पीक प्रशिक्षण कार्यक्रमात अधिक डाळिंब उत्पादनासाठी शास्त्रोक्त पद्धती याविषयी आयसीएआर-एनआरसीपी,सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ (उद्यानविद्या) डॉ. एन. व्ही. सिंह,  डाळिंबावरील प्रमुख रोग व त्यांचे व्यवस्थापन याविषयी आयसीएआर-एनआरसीपी, सोलापूरच्या संचालक.डॉ. ज्योत्सना शर्मा, डाळिंब पिकातील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी आयसीएआर-एनआरसीपी,सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ (मृदाशास्त्र)डॉ.आशिष मैती, विविध पीक हंगामातील डाळिंबावरील किडी व त्यांचे व्यवस्थापन याविषयी आयसीएआर-एनआरसीपी,सोलापूरचे शास्त्रज्ञ (कृषी कीटकशास्त्र) डॉ. मल्लिकार्जुन,  विविध हंगामातील डाळिंब पिकाचे पाणी व्यवस्थापन याविषयी आयसीएआर-एनआरसीपी,सोलापूरचे मुख्य शास्त्रज्ञ (मृदा व पाणी संधारण)  डॉ. पी. शिरगुरे, डाळिंबातील प्रक्रिया व मूल्यवर्धन याविषयी  आयसीएआर-एनआरसीपी, सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ (कृषी रचना व प्रक्रिया अभियांत्रिकी), डॉ. नीलेश गायकवाड मार्गदर्शन करतील.

या कार्यक्रमात झूम अँपद्वारे सहभागी होण्यासाठी दिलेल्या मिटिंग लिंक, आयडी व पासवर्ड चा उपयोग करावा लागेल 
https://us04web.zoom.us/j/73170126943?pwd=SkJCSEJMZ0lhMm1HVG5OaHIwU3ZDQT09
मिटिंग आयडी :७३७०१२६९४३, मीटिंग पासवर्ड १२३४५

तर

 २३ एप्रिल, २०२१ च्या कार्यक्रमाची मिटिंग लिंक
https://us05web.zoom.us/j/83716775601?pwd=VXNyRGR1RHlZSmhiSjI0dTlFWjRQZz...
तर मिटिंग आयडी ८३७ १६७७ ५६०१ व मिटिंग पासवर्ड १२३४५ असं असेल. 

या कार्यक्रमात सर्व शेतकरी बंधू भगिनी, विद्यार्थी, विद्यापीठातील कर्मचारी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ आणि कृषी विभागातील सर्व अधिकारी व विस्तार कार्यकर्ते  सहभागी होण्याची आवश्यकता असल्याचे केव्हीके कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे यांनी कळविले आहे.


इतर ताज्या घडामोडी
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...
धान चुकाऱ्याअभावी शेतकऱ्यांची आर्थिक...गोंदिया : गेल्यावर्षी आधारभूत दराने धान विक्री...
सांगलीत खरिपासाठी हवे ३३ हजार ६९०...सांगली  : यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कृषी...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
तुलनेत यंदा दुपटीने गाळपकोल्हापूर : गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, कांदा, फळ...जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीत...
अस्वलाकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी...भंडारा : जंगलालगत असलेल्या शेतीत वन्यप्राण्यांचा...
अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, ‘...मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर...
अति उष्ण, ढगाळ हवामानआठवडा अखेरपर्यंत ते १००६ हेप्टापास्कल इतके राहतील...
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे...पुणे ः बहुप्रतीक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड...
नाशिक : माथाडी युनियनकडून ‘काम बंद’नाशिक : राज्य शासनाच्या विविध माथाडी मंडळातील...
पुणे ‘जि.प.’तर्फे कर्मचाऱ्यांना मिळणार...पुणे ः ‘‘जिल्हा परिषदेच्या बक्षिस योजनेतून आता...
‘खरिपात सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरा’सातारा : येत्या खरीप हंगामात  सोयाबीनचे...