agriculture news in Marathi, only 10 days for convention , Maharashtra | Agrowon

निवडणुकीत प्रभावी प्रचाराला मिळणार दहाच दिवस
टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

बारामती, जि. पुणे : विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना प्रत्यक्ष प्रचारासाठी अत्यंत कमी दिवस मिळणार असल्याने सर्व मतदारांपर्यंत कसे पोचायचे, याबाबत सर्वांनाच चिंता वाटत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करायची मुदत २७ सप्टेंबरपासून असली तरी, घटस्थापनेपर्यंत म्हणजे २९ सप्टेंबरपर्यंत कोणी अर्ज दाखल करतील अशी शक्यता धूसर आहे. पितृपंधरवडा संपल्यावर म्हणजेच ३० सप्टेंबरपासूनच या प्रक्रियेला प्रारंभ होईल. 

बारामती, जि. पुणे : विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना प्रत्यक्ष प्रचारासाठी अत्यंत कमी दिवस मिळणार असल्याने सर्व मतदारांपर्यंत कसे पोचायचे, याबाबत सर्वांनाच चिंता वाटत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करायची मुदत २७ सप्टेंबरपासून असली तरी, घटस्थापनेपर्यंत म्हणजे २९ सप्टेंबरपर्यंत कोणी अर्ज दाखल करतील अशी शक्यता धूसर आहे. पितृपंधरवडा संपल्यावर म्हणजेच ३० सप्टेंबरपासूनच या प्रक्रियेला प्रारंभ होईल. 

उमेदवारी अर्ज दाखल करायची अंतिम तारीख ४ ऑक्टोबर आहे. उमेदवारांचा अर्ज भरणे, प्रतिज्ञापत्रके, संपत्तीचे विवरण याची गोळाबेरीज करून अर्ज दाखल करेपर्यंत हा काळ निघून जाईल. ७ ऑक्टोबरला अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्या दिवशी प्रत्येक मतदारसंघाचे नेमके चित्र स्पष्ट होईल व त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने प्रचाराला प्रारंभ होणार आहे. यातही ८ ऑक्टोबरला दसरा असल्याने त्या दिवशी प्रचार शक्य होणार नाही. १२ ऑक्टोबरला दुसरा शनिवार व १३ ऑक्टोबरला रविवार असल्याने शहरी भागात सलग दोन दिवस सुट्या असल्याने प्रचार काहीसा थंडावणार हे उघड आहे.

२१ ऑक्टोबरला मतदान असल्याने ४८ तास अगोदर प्रचाराच्या तोफा थंडावणार म्हणजे १९ ऑक्टोबरला संध्याकाळी जाहीर प्रचार थंडावणार. याचाच अर्थ ४ ते १९ ऑक्टोबर असे अवघे १५ दिवसच जाहीर प्रचाराला मिळणार आहेत. यातही प्रचार हा दिवसातील काही ठरावीक तासच शक्य होतो. रात्री दहानंतर प्रचार करता येत नाही आणि सकाळी लवकर प्रचाराला गेले तर माणसे येत नाहीत, ही डोकेदुखी सर्वच राजकीय पक्षांपुढे आहे. यातही ग्रामीण भागात लोकांचे कामाचे तास व शहरी भागात सुटीचे दिवस सोडूनच प्रचार करावा लागत असल्याने तेथेही राजकीय पक्षांना कमालीच्या मर्यादा येतात. प्रचाराला पंधराच दिवस मिळणार असले तरी, त्यातही तासांचा हिशेब केला तर प्रभावी प्रचाराला दहाच दिवस मिळतील, अशी चिन्हे आहेत. 

दरम्यान, ज्या उमेदवाराचे नाव शेवटच्या क्षणी जाहीर होईल, त्यांना तर मतदारांपर्यंत पोचण्यासाठी अक्षरशः पळापळच करावी लागेल. 

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
पशुधनवाढीचे विश्लेषण कधी? आपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार...
आरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि...सुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती...
तळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची...पुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार...
जिद्द, चिकाटीतून यशस्वी केला...हिंगोली जिल्ह्यातील जडगाव (ता. औंढानागनाथ) येथील...
वादळी पावसाचा अंदाज कायमपुणे  : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
पावसाचा पुन्हा दणकापुणे  : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...
सर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...
बहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...
यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...
वादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
‘महाराष्ट्रा’साठी आज मतदान ! तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...
केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
फळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...
कांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...
दुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...