agriculture news in marathi, Only 11% sowing of rabbis in Pune division | Agrowon

पुणे विभागात रब्बीची केवळ ११ टक्के पेरणी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

पुणे ः पावसाच्या खंडाचा परिणाम रब्बी हंगामातील पेरण्यावर झाला आहे. पावसाअभावी अनेक भागांत पुरेशी ओल नसल्याने रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पुणे विभागातील नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरीच्या १७ लाख ८१ हजार ३५ हेक्टरपैकी केवळ एक लाख ८८ हजार ८६२ हेक्टर म्हणजेच ११ टक्के पेरणी झाल्याचे चित्र आहे.

पुणे ः पावसाच्या खंडाचा परिणाम रब्बी हंगामातील पेरण्यावर झाला आहे. पावसाअभावी अनेक भागांत पुरेशी ओल नसल्याने रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पुणे विभागातील नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरीच्या १७ लाख ८१ हजार ३५ हेक्टरपैकी केवळ एक लाख ८८ हजार ८६२ हेक्टर म्हणजेच ११ टक्के पेरणी झाल्याचे चित्र आहे.

पुरेसा पाऊस न पडल्याने जमिनीत ओलाव्याचे प्रमाण कमी असल्यामुळे पेरणीच्या क्षेत्रात काही प्रमाणात घट होणार असल्याची स्थिती आहे. पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी हंगामात गहू, ज्वारी, बाजरी पेरणीचे नियोजन केले आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र रब्बी ज्वारीचे आहे. विभागात रब्बी ज्वारीचे सरासरी १३ लाख ५ हजार ४१० हेक्टर क्षेत्र आहे. गव्हाचे एक लाख ५४ हजार ८४० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापाठोपाठ हरभरा पिकांचे दोन लाख १७ हजार २२० हेक्टर क्षेत्र आहे. मक्याचे ७८ हजार ९५० हेक्टर क्षेत्र आहे.

यंदा विभागातील नगर जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारी पिकांची ९७ हजार ४५६ हेक्टर, हरभरा ५ हजार ६९६ हेक्टर व मका ८६१ हेक्टरवर पेरणी झाली. जिल्ह्यामध्ये पुरेसा पाऊस न झाल्यामुळे उर्वरित पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पुणे जिल्ह्यात खरिपातील भात पिके दाणे भरण्याच्या अवस्थेत असून काही ठिकाणी काढणीस सुरवात झाली आहे.

पूर्व पट्ट्यातील तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे जमिनीत ओलाव्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे रब्बी ज्वारीची केवळ २९ हजार ३२४ हेक्टर, मका १२००, हरभरा ३१८३ हेक्टरवर पेरणी झाली. करडई, सूर्यफुल, गहू या पिकांच्या पेरण्या खोळंबल्याचे चित्र आहे. सोलापूर जिल्ह्यात खरिपातील मूग, उडीद पिकांची काढणी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणी तयारी केली आहे. मात्र, पुरेशा ओलीअभावी पेरण्या खोळंबल्या असून ज्वारी पिकांची अवघ्या ४४ हजार ८७७ हेक्टर, मका ३३०७, हरभरा २५२५ व सूर्यफूल ११९ हेक्टरवर पिकांची हेक्टरवर पेरणी झाली आहे.

पुणे विभागात रब्बीची पेरणी (क्षेत्र हेक्टरमध्ये)
पीक झालेली पेरणी
रब्बी ज्वारी १,७१,६५७
गहू १७२
मका ५३६८
इतर तृणधान्य ३०
हरभरा ११,४०४
करडई ९८
जवस
सूर्यफुल १२६
इतर गळीतधान्य

 

इतर बातम्या
बीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९...उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
वनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा...कडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...
दर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...
अवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...
महिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...