ट्रॅक्टरला अनुदान सव्वा लाखच

ट्रॅक्टर
ट्रॅक्टर

पुणे : देशातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी पाच लाखांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय केंद्राने घेतला असला तरी, राज्यात मात्र अनुदानाची मर्यादा सव्वा लाखापर्यंतच ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.  कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी चौपट अनुदान द्यावे, असा आग्रह केंद्र सरकारकडे काही राज्यांनी धरला होता. अखेर केंद्राने ही मागणी स्वीकारून अनुदान मर्यादा चौपट केली. मात्र, महाराष्ट्रात वाढीव अनुदानाची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्यात आली. केंद्राने काहीही निर्णय घेतला असला तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी अनुदान देणे हाच मुख्य उद्देश राज्य शासनाचा आहे. त्यामुळे राज्यात प्रत्येक ट्रॅक्टरमागे पाच लाखांचे अनुदान वाटू नये. तसे केल्यास केंद्राचा निधी पुरणार नाही, असे कृषी विभागातून राज्य शासनाला सुचविण्यात आले होते. ‘‘राज्यात ट्रॅक्टरची खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याला सव्वा लाखापर्यंत अनुदान देण्यास मान्यता द्यावी. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला अनुदान मिळणे शक्य होईल, अशा आशयाचा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाने राज्य शासनाला पाठविला होता’’, अशी माहिती सूत्रांनी दिली.  कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांना पाच डिसेंबरला पाठविलेल्या पत्रात ट्रॅक्टर अनुदान मर्यादा सव्वा लाखापर्यंतच राहील, असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. शासनाच्या धोरणात्मक बदलाप्रमाणे ट्रॅक्टर अनुदान वाटपाची प्रक्रिया राबविण्याच्या सूचना आयुक्तांनी गुण नियंत्रण संचालक विजयकुमार इंगळे यांना दिल्या आहेत.  कोणाला किती अनुदान मिळेल अनुसूचित जाती व जमातीचे शेतकरी, महिला शेतकरी तसेच अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला ट्रॅक्टर किमतीच्या ५० टक्के किंवा सव्वा लाख रुपये यापेक्षा जे कमी असेल ती रक्कम अनुदान स्वरूपात मिळेल. राज्यात इतर गटांतील शेतकऱ्याला ट्रॅक्टर किमतीच्या ४० टक्के किंवा एक लाख रुपये यापेक्षा कमी असेल ते अनुदान मिळणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com