agriculture news in marathi, Only 13 percent of the dams in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ १३ टक्के
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 जून 2018

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील धरणसाठ्यात झपाट्याने घट होत असून आजमितीस जिल्ह्यातील १७ मध्यम, ७ मोठ्या अशा एकूण २४ प्रकल्पांत १३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. तर अनेक धरणांनी तळ गाठण्यास सुरवात केली असल्याचे दिसून येत आहे. मात्र, ३ जुलैपर्यंत पाणी पुरेल, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. जोपर्यंत पुरेसा पाऊस पडत नाही तोपर्यंत पाण्याचे टँकर सुरूच ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील धरणसाठ्यात झपाट्याने घट होत असून आजमितीस जिल्ह्यातील १७ मध्यम, ७ मोठ्या अशा एकूण २४ प्रकल्पांत १३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. तर अनेक धरणांनी तळ गाठण्यास सुरवात केली असल्याचे दिसून येत आहे. मात्र, ३ जुलैपर्यंत पाणी पुरेल, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. जोपर्यंत पुरेसा पाऊस पडत नाही तोपर्यंत पाण्याचे टँकर सुरूच ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

जिल्ह्यातील धरणांची पाणी साठवण क्षमता ६५ हजार ८१४ दलघफू इतकी आहे. सद्यःस्थितीत धरणांत ८ हजार ७८६ दलघफू एवढाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. याच पाण्यावर जिल्हावासीयांची पुढील महिन्याची भिस्त अवलंबून आहे.
गतवर्षी आजपर्यंत १३ टक्के पाणीसाठा होता. गंगापूर, करंजवण, दारणा आणि कडवा या चार प्रकल्पांत गेल्यावर्षापेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे. तर वाघाड, पुणेगाव, हरणबारी प्रकल्पांतील पाणीसाठा पाच टक्क्यांवर आला आहे. जिल्ह्यात आजमितीस ९२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्यावर्षी ७८ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत होता. चक्रीवादळामुळे माॅन्सून लांबण्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवल्याने ग्रामीण भागात टंचाईच्या झळा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

सहा धरणे कोरडी
जिल्ह्यात सात धरणे कोरडीठाक पडली आहेत. यात भावली, मुकणे, वालदेवी, भोजापूर, नागासाक्या, माणिकपुंज या धरणांनी तळ गाठला आहे.

गंगापूर समूहात २२ टक्के पाणी
शहरवासीयांची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणात २४ टक्के, काश्यपी ३५ टक्के, गौतमी गोदावरी ९ टक्के तर आळंदीत १२ टक्के असा समूहात एकूण २२ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच कालावधीत समूहात १५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत समूहात ७ टक्के अधिक साठा असल्याने टंचाई निर्माण होणार नसल्याचा दावा केला आहे.

जिल्ह्यातील पाणीसाठा : धरण (टक्केवारी) : गंगापूर २४, काश्यपी ३५, गौतमी गोदावरी ०९, आळंदी १२, पालखेड २८, करंजवण १०, वाघाड ०३, ओझरखेड १५, पुणेगाव ०७, तीसगाव ०३, दारणा २९, कडवा १०, नांदूरमध्यमेश्वर ९८, चणकापूर २३, हरणबारी ०३, केळझर ०१, गिरणा १०.

इतर ताज्या घडामोडी
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...