दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
बातम्या
जाम प्रकल्पात केवळ १४ टक्के साठा
नागपूर : कोंढाळी व काटोल शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जाम प्रकल्पात अवघा १४ टक्के साठा उरला आहे. त्यामुळे पाणीटंचाईसह सिंचनाचा प्रश्नही येत्या काळात गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नागपूर : कोंढाळी व काटोल शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जाम प्रकल्पात अवघा १४ टक्के साठा उरला आहे. त्यामुळे पाणीटंचाईसह सिंचनाचा प्रश्नही येत्या काळात गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
काटोल तालुक्यात सरासरी पर्जन्यमान ८०० मिलिमीटर आहे. मात्र, २०१८ मध्ये तालुक्यात केवळ ४०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या कमी पर्जन्यमानाचा फटका खरीप व रबी पिकांसोबतच संत्रा, मोसंबी बागांनाही बसला आहे. नदी, नालेही २०१८ च्या ऑक्टोबर अखेरीस कोरडे पडले. त्यामुळे पातळी नोव्हेंबरपासून खालावली. या पाणी समस्येचा सामना करण्यासाठी प्रशासनाने काही उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. त्या अंतर्गत १ जानेवारी ते ३१ मार्च काळासाठी टंचाई आराखडा तयार केला आहे.
कोंढाळी तालुक्यातील एकूण १२४ गावांमध्ये १२३ कायमस्वरुपी नळयोजना असून, ३३९ हातपंप, १९८ सार्वजनिक विहिरी, २५१ खासगी विहिरी आहेत. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ३० गावांमधील ३२ खासगी विहिरींच्या अधिग्रहणासाठी ११ लाख ५२ हजार रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. काटोल तालुक्यातील पाणीसमस्येसाठी एकूण ५ कोटी ७७ लाख ७२ हजार रुपये प्रस्तावित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
संत्रा, मोसंबी बागांना फटका
जाम प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा उरला आहे. पिण्यासोबतच संत्रा, मोसंबी बागांच्या सिंचनासाठी या प्रकल्पातील पाण्याचा वापर होतो. पिण्याकरिता हे पाणी आरक्षित करण्यात आल्याने सिंचनकामी वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
- 1 of 1497
- ››