Agriculture news in marathi, Only 1.5 lakh farmers in Jalgaon district participate in crop insurance scheme | Agrowon

जळगाव जिल्ह्यात दीड लाख शेतकरीच पीकविमा योजनेत सहभागी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 सप्टेंबर 2021

जळगाव ः दर वर्षी ऑगस्ट, सप्टेंबरअखेर शेतकरी हिस्सा रकमेचा भरणा केल्यानंतर पीकविमा कंपन्यांकडून शासनाकडे माहिती सादर केली जाते. मात्र पीकविम्याची रक्कम अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे पीकविमा घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे.

जळगाव ः दर वर्षी ऑगस्ट, सप्टेंबरअखेर शेतकरी हिस्सा रकमेचा भरणा केल्यानंतर पीकविमा कंपन्यांकडून शासनाकडे माहिती सादर केली जाते. मात्र पीकविम्याची रक्कम अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे पीकविमा घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. जिल्ह्यात सहा लाख शेतकरी आहेत. त्यांपैकी केवळ दीड लाख शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला आहे. 

दर वर्षी दुष्काळ अतिवृष्टी, वादळे, गारपीट वा अन्य नैसर्गिक संकटांमध्ये खरीप रब्बी हंगामातील शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटातून दिलासा मिळावा, त्यांना आर्थिक नुकसानीपोटी मदत मिळावी, या साठी ही योजना राबविण्यात येते. 

यंदा खरीप हंगामात एक लाख ४९ हजार ४९४ शेतकऱ्यांनी पीकविम्यापोटी शेतकरी हिस्सा रकमेचा भरणा केला. एक लाख ४८ हजार ६८९ हेक्टर क्षेत्र पीकविमा योजनेंतर्गत संरक्षित झाले आहे. गेल्या वर्षी एक लाख ६३ हजार ४९९ शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेसाठी नोंदणी केली होती. या नोंदणीकृत शेतकऱ्यांना खरीप, रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्ती नुकसानीचे पंचनामे होऊनदेखील पीकविमा नुकसानभरपाई मिळाली नाही. या मुळेच अनेक राष्ट्रीयकृत व खासगी बँकांवर या संदर्भात गुन्हे दाखल झाले आहेत. 

कपाशीचा सर्वाधिक विमा 

पीकविमा घेतलेले शेतकरी ः उडीद ६७१ हेक्टर (शेतकरी ७११), मूग १,७३८ (१,९३८), कपाशी एक लाख ३३ हजार ४३० (एक लाख ३३ हजार ३९८), भुईमूग १८४ (२२२), मका ६,७५९ (६,८६९), ज्वारी १,३१२ (१,४१७), बाजरी १६९ (१९२), तूर ७३२ (८३५), तीळ ६० (६५), सोयाबीन ३,७९३ (३,८४७). एकूण एक लाख ४८ हजार ८६९ हेक्टर क्षेत्रासाठी एक लाख ४९ हजार ४९४ शेतकऱ्यांचा पीकविमा संरक्षित झाला आहे.


इतर बातम्या
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...
शेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...
मराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...
जळगाव जिल्ह्यास पावसाने झोडपलेजळगाव  : जिल्ह्यात गुरुवारी (ता.२३) अनेक...
तडवळेत जोरदार पावसामुळे सोयाबीन...कसबे तडवळे, जि. उस्मानाबाद : परिसरात गेल्या चार...
परभणी, हिंगोलीत पावसाने सोयाबीनला फुटले...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु...