नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून १५ टक्केच कर्जवाटप

नांदेड : जिल्ह्यात सर्वाधिक शाखा असलेल्या राष्ट्रीयीकृत बॅंकांनी आजपर्यंत केवळ १५ टक्केच पीक कर्जवाटप केल्याचे स्पष्ट झाले आहे.
Only 15 percent loan disbursement from nationalized banks in Nanded district
Only 15 percent loan disbursement from nationalized banks in Nanded district

नांदेड : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी दोन हजार ३१ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट प्रशासनाने बॅंकांना दिले आहे. असे असताना जिल्ह्यात सर्वाधिक शाखा असलेल्या राष्ट्रीयीकृत बॅंकांनी आजपर्यंत केवळ १५ टक्केच पीक कर्जवाटप केल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ जिल्हा बॅंकेने १४४ टक्के व ग्रामीण बॅंकने ७५ पीक कर्जवाटप केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली.

जिल्हास्तरीय बॅंकर्स कमिटीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी आगामी खरीप हंगामात जिल्ह्यासाठी दोन हजार ३१ कोटी, तर रब्बीसाठी ५०७ कोटी असे एकूण दोन हजार ५३९ कोटींचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट २८ बॅंकांना दिले. या बाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी शेतकऱ्यांना वेळेत कर्ज देण्याची सूचना दिली होती. 

लॉकडाउनमध्ये पीक कर्जवाटपाचे काम ठप्प होते. यामुळे वाटपाचे प्रमाण कमी असल्याचे बॅंकांचे म्हणणे आहे. पीक कर्जमाफीसाठी पात्र खात्यांवर कर्जमाफीची रक्कम वर्ग झाल्यानंतर त्या खात्याला नव्याने कर्ज मिळेल, अशा शेतकऱ्यांना मात्र राष्ट्रीयीकृत बॅंकेने कर्जवाटप केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी आजपर्यंत जिल्ह्यात २६ हजार ८८७ खातेदारांना २२७ कोटी ६७ लाखांचे कर्जवाटप केले आहे.

जिल्हा बॅंकेकडून ५५ हजार ४५९ शेतकऱ्यांना दोन २६८ कोटी ३५ लाख, तर महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेकडून ३३ हजार ८५३ शेतकऱ्यांना २१६ कोटी ६६ लाखांचे कर्जवाटप केले. एकूण एक लाख १६ हजार १९९ शेतकऱ्यांना ७१२ कोटी ५६९ लाख रुपयांचे कर्जवाटप झाले.  आता शेतकऱ्यांना खरिपाचे कर्ज मिळेल की नाही, अशी भिती आहे. पात्र शेतकऱ्यांना खरिप, रब्बी अथवा उन्हाळा कोणत्याही हंगामात पीक कर्ज घेता येईल, अशी माहिती जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक गणेश पाठारे यांनी दिली.

ज्यांना कर्ज मिळाले नाही, त्यांना पुढील काळात कर्ज मिळेल. यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करु नये. - गणेश  पाठारे, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बॅंक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com