agriculture news in marathi, Only 155 corer for Solapur district Kharif crop loan | Agrowon

सोलापुरात खरिपासाठी अवघे १५५ कोटींचे कर्जवाटप
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 मे 2018

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी कर्जवाटपाचे उद्दिष्ट १३८४ कोटी रुपये असताना, आतापर्यंत केवळ १५५ कोटींचे वाटप झाले आहे. बॅंकांच्या या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पुरेसे कर्जवाटप करा आणि गतवर्षीच्या तुलनेत यंदा कर्जवाटपाचा टक्‍का सुधारा, अशा शब्दांत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंगळवारी (ता. १५) बॅंकेच्या अधिकाऱ्यांना सुनावले.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी कर्जवाटपाचे उद्दिष्ट १३८४ कोटी रुपये असताना, आतापर्यंत केवळ १५५ कोटींचे वाटप झाले आहे. बॅंकांच्या या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पुरेसे कर्जवाटप करा आणि गतवर्षीच्या तुलनेत यंदा कर्जवाटपाचा टक्‍का सुधारा, अशा शब्दांत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंगळवारी (ता. १५) बॅंकेच्या अधिकाऱ्यांना सुनावले.

खरीप हंगाम कर्जवाटपाच्या आढावा बैठकीत डॉ. भोसले यांनी ही भूमिका घेतली. सोलापूर जिल्हा हा रब्बीचा जिल्हा आहे; परंतु मागील काही वर्षांपासून खरीप पिकांची लागवड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. खरीप हंगामासाठी बॅंकांना जिल्हा अग्रणी बॅंकेकडून कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दर आठवड्याला कर्जवाटपाचा आढावा घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार मंगळवारी (ता. १५) जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सर्व बॅंकांची बैठक घेतली. परंतु, बॅंक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बॅंकेसह अन्य तीन बॅंकांचे प्रतिनिधी गैरहजर राहिले. त्यांच्याकडून आता खुलासा मागविला आहे. त्यातच जिल्ह्यातील जिल्हा बॅंकेसह राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून एकूण कर्जाच्या केवळ १५५ कोटी रुपयांचे वाटप केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तेव्हा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी बॅंकांना चांगलेच सुनावले. कोणत्याही परिस्थितीत कारणांचा पाढा न वाचता काम करा, अडचणी असतील तर सांगा, पण दिलेले उद्दिष्ट पूर्ण केलेच पाहिजे, असे सांगितले. तसेच खरीप हंगामात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत शेतकऱ्यांना पुरेसा कर्जपुरवठा करावा, जेणेकरून त्यांना खासगी सावकाराकडे जाण्याची वेळ येऊ नये, याची बॅंकांनी खरबरदारी घ्यावी. तसेच कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांनाही बॅंकांकडून कर्जपुरवठा व्हावा. 

२३ हजार शेतकऱ्यांना कर्जवाटप
यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला एकूण १३८४.०८ कोटी इतके उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. त्यात जवळपास १ लाख ५० हजार ५५० शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे; पण बॅंकांच्या उदासीनतेमुळे हंगाम तोंडावर आला, तरी आत्तापर्यंत केवळ २३ हजार ७४६ शेतकऱ्यांना १५५ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. एकूण कर्जवाटप आणि शेतकऱ्यांची संख्या पाहता, अतिशय धीम्या गतीनेच ही प्रक्रिया चालल्याचे दिसून येते.

इतर ताज्या घडामोडी
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...
पक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर  : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...
पुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...
‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर  ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...
जनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई  : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...
भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा   ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...
अमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती   ः जिल्ह्यातील चौदाही...
समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती  : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...