agriculture news in Marathi only 16 lac income for vitthal rukmini mandir samiti Maharashtra | Agrowon

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला यंदा केवळ १६ लाखांचे उत्पन्न

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 जुलै 2020

आषाढी यात्रेला श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीला विविध देणग्यांच्या माध्यमातून गेल्यावर्षी तब्बल चार कोटी ४० लाख रुपये उत्पन्न मिळाले होते.

पंढरपूर जि. सोलापूर ः आषाढी यात्रेला श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीला विविध देणग्यांच्या माध्यमातून गेल्यावर्षी तब्बल चार कोटी ४० लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. यंदा मात्र कोरोनामुळे आषाढी यात्रा भरू न शकल्यामुळे श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीला केवळ १६ लाख १५ हजार ८६० रुपये देणगी स्वरूपात उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी दिली.

दरम्यान वाढत्या टाळेबंदीमुळे १५ जुलैपर्यंत भाविकांना मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी यात्रा काळात आठ दिवस लाखोंच्या संख्येने भाविक श्री विठ्ठलाचे दर्शन घेतात. आलेले भाविक मंदिरातील देणगी पेटीमध्ये काही ना काही रक्कम टाकतात तर काही भाविक देणगी पावती करतात. वारकरी भाविकांच्या माध्यमातून श्री विठ्ठल- रुक्‍मिणीच्या चरणाजवळ देखील मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा होत असते.

२०१८ मध्ये श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीला आषाढी यात्रा काळात दोन कोटी ९० लाख ४४ हजार ६४१ एवढे उत्पन्न मिळाले होते. मागील वर्षी २०१९ मधील आषाढी यात्राकाळात त्यामध्ये एक कोटी ४४ लाख ९३ हजार १४५ रुपयांची वाढ होऊन श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीला तब्बल चार कोटी ४० लाख ३७ हजार ७८६ इतके उत्पन्न मिळाले होते. यंदा मात्र आषाढी यात्रा भरू शकली नाही. कोरोनामुळे भाविकांना पंढरपूरला येण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे उत्पन्नात लक्षणीय घट झाली.

यंदा १६ लाखांचे उत्पन्न
आषाढी एकादशी दिवशी श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीला दरवर्षी आयआरबी कंपनीकडून देणगी दिली जाते. यंदा या कंपनीकडून ११ लाख रुपये देणगी धनादेश जमा करण्यात आला. याशिवाय अन्य काही भाविकांनी देणगी जमा केली. याशिवाय अन्नछत्र कायमस्वरूपी ठेव योजनेसाठी ऑनलाइनद्वारे ६६ हजार रुपये जमा झाले. महानैवेद्य योजनेसाठी ऑनलाइन ३० हजार रुपये जमा झाले तर तीन लाख ४२ हजार ७१२ रुपये ऑनलाइन देणगी जमा झाली. एकूण १६ लाख १५ हजार ८६० रुपये उत्पन्न मंदिर समितीला मिळाले.


इतर अॅग्रो विशेष
पावसाची सर्वदूर संततधार; धरणसाठ्यात वाढपुणे : गेल्या दोन दिवसापासून राज्यातील बहुतांशी...
राज्यात आज आणि उद्या पाऊस जोर धरणारपुणे :  गेल्या तीन ते चार दिवसापासून...
`सक्ती’चे होईल स्वागतयुरिया विकत घेताना सोबत जैविक (जीवाणू) खते...
देशाला स्वातंत्र्य मिळाले पण...शेतमालाचेच भाव का कोसळतात? कांदा, टोमॅटो ...
नवी बाजार व्यवस्था नवी आव्हानेसध्यातरी बाजार समितीचा कर नाही म्हणून व्यापारी...
आकडे, आरोग्य अन् आयातखाद्यतेलावरील आयातशुल्कात वाढ करून आयातीवर...
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
द्राक्ष पीककर्ज कर्जमाफीत बसेना आणि...नाशिक : द्राक्षासाठी घेतलेले पीककर्ज  ...
कर्जमाफीसाठी दीड हजार कोटीमुंबई: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जैविक खतांचा वापर सक्तीचा होणार पुणे: युरिया विकत घेताना जैविक खते देखील विकत...
राज्यातील पंधरा जिल्हा बँकांना ...लातूर ः राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
राज्यात पावसाची रिपरिप सुरुच पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात रिमझिम असून...
निकृष्ट बियाणेप्रकरणी ४० न्यायालयीन खटलेवाशीम ः यंदाच्या हंगामात निकृष्ट बियाण्यामुळे...
चांदोली धरणग्रस्त विस्थापीतांनी केली २५...मांगले, जि. सांगली ः  चांदोली धरणग्रस्तामधील...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
पावसाचा जोर कायम राहणार पुणे: गुजरातच्या दक्षिण भागात चक्राकार...
कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्यापुणे : कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत...
मका विक्रीचे चुकारे ४० दिवसांनंतरही थकितजळगाव ः जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मका...
कोकणात मुसळधारेचा अंदाजपुणे ः  उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते...