सांगली जिल्ह्यात फक्त १८ टक्के पाणीसाठा 

सांगली जिल्ह्यात फक्त १८ टक्के  पाणीसाठा 
सांगली जिल्ह्यात फक्त १८ टक्के पाणीसाठा 

सांगली : जिल्ह्यातील ७९ लघू प्रकल्प, तर पाच मध्यम प्रकल्पांत फक्त १८ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. ८४ तलावांपैकी ४० तलाव कोरडे आहेत. गत वर्षाच्या तुलनेत तलावांमध्ये तब्बल ३ टक्के पाणीसाठा कमी आहे. दुष्काळाची दाहकता वाढतच असल्याने मेमध्ये बहुतांशी तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत.  

मागील पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. यामुळे जिल्ह्यातील लघू आणि मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. परिणामी परिणाम दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. सध्या १८० हून अधिक गावे आणि हजारावर वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पुरेसा पाऊस पडला नसल्याने, उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत. लघू आणि मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठाही झपाट्याने खालावत आहे. गतवर्षी या तारखेला तब्बल २१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्या तुलनेत यंदा ३ टक्के पाणीसाठा कमी आहे.

मध्यम प्रकल्पांत ५८.४९ टक्के पाणी 

जिह्यातील तलावांमध्ये ५८.४९ दलघफू इतका पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये लघू प्रकल्पांत १९.२२, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात ३४.३६, आणि मोरणा शिराळा प्रकल्पात २.९ दलघफू इतके पाणी आहे. सात मध्यम प्रकल्पांपैकी, दोड्डानाला संख, बसाप्पावाडी, सिद्धेवाडी हे तलाव कोरडे आहेत. जतमधील दोड्डानाला, संख, बेळुंखी, भिवर्गी, बिळूर, दरिबडची, गुगवाड, जालिहाळ, खाजनवाडी, मिरवाड, पांडोझरी, सिद्धनाथ, तिकोंडी एक, दोन, कवठेमहांकाळमधील, हरोली, रायवाडी, खानापूरमधील भांबर्डे, लेंगरे, सुलतानगादे, मिरजेतील भोसे, तासगावधील अंजनी, बलगवडे, आटपाडीतील अर्जुनवाड, दिघंची, गोरडवाडी, विभूतवाडी या तलावांचा समावेश आहे. 

८४ पैकी २७ तलाव कोरडे 

मध्यम आणि लघू मिळून ८४ तलाव आहेत. त्यामध्ये ३२७.५७७ दलघफू इतका पाणीसाठा आहे. त्यातील २७ तलाव कोरडे असून, सर्वाधिक जत तालुक्यातील १६ तलावांचा समावेश आहे. याशिवाय तासगाव ३, खानापूर ३, आटपाडी २, कवठेमहांकाळ ५ आणि मिरज येथील एक तलावांचा समावेश आहे. २० तलावांत फक्त २५ टक्के पाणीसाठा आहे. १२ तलाव मृतसाठ्याखाली गेले आहेत. तर २५ ते ५० टक्के पाणीसाठा १२ तलावामध्ये आहे. 

टेंभू-ताकारी, म्हैसाळमुळे तलाव भरले 

वाढत्या उन्हामुळे विहिरी, तलावांनी तळ गाठला आहे. कूपनलिकाही बंद पडत आहेत. त्यामुळे कृष्णा नदीवरील टेंभू-ताकारी आणि म्हैसाळ जलसचिंन योजना सुरू करून २० ते २५ मध्यम आणि लघू प्रकल्प भरून घेण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आवर्तन सुरू आहे. यामुळे पाण्याचा प्रश्न तोडाफार सुटला आहे. यामुळेच प्रकल्पात पाणीसाठा दिसून येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com