agriculture news in Marathi only 24 percent crop loan distribution in Sangali District Maharashtra | Page 3 ||| Agrowon

सांगली जिल्ह्यात केवळ २४ टक्के पीककर्ज वाटप 

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 मे 2020

यावर्षी खरीपासाठी १ हजार ५५७ कोटीचे उद्दिष्ट असून त्यापैकी केवळ ३७५ कोटी म्हणजे २४ टक्के इतकेच कर्ज वाटप झाले आहे.

सांगली ः यावर्षी खरीपासाठी १ हजार ५५७ कोटीचे उद्दिष्ट असून त्यापैकी केवळ ३७५ कोटी म्हणजे २४ टक्के इतकेच कर्ज वाटप झाले आहे. पीक कर्ज वितरणांमध्ये ज्या बॅंकांची कामगिरी असमाधारकारक आहे अशा बॅंकांनी आपली कामगिरी न उंचावल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात कर्ज वाटपासह अन्य विषयाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक आर. पी. यादव, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर, नाबार्डचे लक्ष्मीकांत धानोरकर यांच्यासह विविध आर्थिक विकास महामंडळांचे अधिकारी, बॅंकांचे समन्वयक उपस्थित होते. 

अप्पर जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यामध्ये शेती उत्पादकता वाढावी यासाठी बॅंकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कर्ज प्रकरणे मार्गी लावावीत. खरीपासाठी २०२०-२१ साठी १५५७ कोटी रूपयांचे पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट असून शेतकऱ्यांना ३७५ कोटी रूपयांचे पीक कर्जाचे वितरण झाले असून उद्दिष्टाच्या २४ टक्‍के आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी बॅंकांनी पुढाकार घ्यावा. पीक कर्ज वाटप करताना कोणत्याही अडचणी येवू नयेत, अशा पध्दतीने काम करण्याच्या सूचना बॅंकाना दिल्या आहेत. 

कर्ज वितरणामध्ये सातबारा, अभिलेख्यांची कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे आवश्‍यक आहे. तसेच ज्या बॅंकांनी खरीप पीक कर्ज वितरणात दुर्लक्ष केले आहे त्यांनी त्यांची जिल्हा अग्रणी बॅंकेने बैठक घ्यावी व उद्दिष्टपूर्ती करून घ्यावी. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने शेतकऱ्यांना कर्जाचे वापट अधिक केले आहे. 


इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम;...रत्नागिरी  ः जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे...
चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर सांगली  : जिल्ह्यात बुधवार (ता. ८)...
परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातच २९...परभणी : सोयाबीनच्या निकृष्ट बियाण्यांमुळे...
दापोली, मंडणगडमधील ५८५० हेक्टर क्षेत्र...रत्नागिरी  ः निसर्ग चक्रीवादळामुळे दापोली...
पावसाळी स्थितीतील द्राक्षबागेचे नियोजनगेल्या आठवड्यापासून सर्वच भागात पावसाची नोंद झाली...
रताळे लागवडीसाठी सुधारित जातीरताळे हे आहार, जनावरांचा चारा आणि औद्योगिक...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची ५००० ते ६८७५...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
टप्प्याटप्प्याने करतो डाळिंब बहराचे...शेतकरी नियोजन पीक ः डाळिंब शेतकरी ः ज्ञानेश्वर...
कृषी हवामान सल्‍ला (मराठवाडा विभाग)भारतीय हवामान विभागाच्‍या अंदाजानुसार,...
शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह असलेले उद्योग का...नाशिक : शासन नवीन उद्योगांची घोषणा करत आहे. मात्र...
देवळा तालुक्यात युरिया टंचाईनाशिक : देवळा तालुक्यात हंगामाच्या सुरुवातीला...
अंदरसूल उपबाजारात उन्हाळ कांदा आवकेत वाढनाशिक : वैजापूर (जि. औरंगाबाद) येथील बाजार...
खानदेशात पेरणी ९० टक्‍क्‍यांवरजळगाव ः खानदेशात पेरणी जवळपास पूर्ण होत आली आहे....
अकोला : गतहंगामातील पीक विम्यापासून...अकोला ः गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी काढलेल्या...
सोयाबीन बियाणेप्रकरणी शासनाने मदत...अकोला ः जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात पेरणीनंतर...
औरंगाबाद जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत आला...चिते पिंपळगाव, जि. औरंगाबाद : येथील कृषी सेवा...
सांगली जिल्ह्यात पीक कर्जवाटपात...सांगली ः जिल्हा बॅंकेने जूनअखेर ६६.८२ टक्के...
खानदेशात मुसळधार पावसाने जमिनी खरडल्याजळगाव ः खानदेशात मागील २० ते २२ दिवसांमध्ये अनेक...
तुळसवडेतील शेतात ‘रयत क्रांती संघटने’चे...राजापूर, जि. रत्नागिरी : कोरोनामुळे  ...
खतांची साठेमारी करणाऱ्यांवर कारवाई...नागपूर : जिल्ह्यात युरियाचा मुबलक साठा उपलब्ध आहे...