पुणे जिल्ह्यात रब्बीत अवघे २५ टक्के पीक कर्जवाटप

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केले जाते. यंदा बँकेने निर्धारित उद्दिष्ठाच्या ६५८ कोटी ८५ लाख ९६ हजार रुपयांच्या पीक कर्जापैकी अवघे १६७ कोटी १४ लाख २ हजार रुपये म्हणजेच २५ टक्के पीक कर्जवाटप केल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पीक कर्जवाटपात यंदा २३ टक्क्यांनी घट झाली असून, चालू वर्षी ठेवलेले उद्दिष्टही साध्य होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

गेल्या वर्षी बँकेने ५८४ कोटी ५३ लाख ७९ हजार रुपयांपैकी ५८ हजार ७०२ सभासदांना २८२ कोटी ३९ लाख ६७ हजार रुपयांचे पीक कर्जाचे वाटप केले होते. जिल्ह्यात बँकेने सरासरी ४८ टक्के वाटप केले होते. मात्र, यंदा बँकेकडून अत्यंत कमी पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. रब्बी हंगामात पुणे जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी निविष्ठा खरेदीसाठी बँकेकडून पीक कर्ज घेतात. त्यातून पेरणीसाठी लागणारी खते, बियाणे, नागरट अशी विविध कामे या पीक कर्जातून शेतकरी भागवतात.

सध्या जिल्ह्यात रब्बीतील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे पीक कर्ज वाटपात घट होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तालुका व गावपातळी एकूण २६५ शाखा आहेत. या शाखांकडून सहकारी सोसाट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत शून्य टक्के तर तीन लाखांपर्यंत एक टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले आहे.

त्यामुळे शेतकरी ऊस, कांदा, टोमॅटो, बटाटा, फळबागमध्ये द्राक्ष, केळी, डाळिंब, आंबा, फूलशेतीमध्ये गुलाब, जरबेरा, कार्नेशन, फळभाज्यामध्ये ढोबळी मिरची, तसेच भात, ज्वारी, बाजरी, भुईमूग यासह इतर पिकांनाही पीक कर्ज दिले जाते. त्यामुळे दरवर्षी पीक कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते.

यंदा शासनाने केलेल्या कर्जमाफीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम मिळाली आहे. त्यातून अनेक शेतकऱ्यांनी शेतीतील आर्थिक अडचणी भागविल्या आहेत. त्यामुळे पीक कर्जात घट झाली असल्याचे बँकेच्या सूत्रांनी सांगितले. पीकनिहाय झालेले पीककर्जाचे वाटप

पीक                   रक्कम ऊस                    ४६ कोटी ९१ लाख ३३ हजार रुपये, टोमॅटो                १० कोटी ३७ लाख ४३ हजार, कांदा                  ६० कोटी ५७ लाख १८ हजार, बटाटा                 ४२ कोटी ३२ लाख ३४ हजार द्राक्षे                    १ कोटी १४ लाख ९० हजार, केळी                   ४ लाख २ हजार डाळिंब                १ कोटी ४३ लाख ४४ हजार आंबा                   ७९ हजार ज्वारी, बाजरी      ४ कोटी ११ लाख ६३ हजार, इतर पिके            ९६ हजार 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com