agriculture news in Marathi, only 25 percent water stock in state, Maharashtra | Agrowon

राज्यात अवघा २५ टक्के पाणीसाठा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 जुलै 2019

पुणे : जुलै महिना संपत आला, तरीही पावसाने पुरेशी हजेरी न लावल्याने राज्यातील पाणीसाठ्याची स्थिती गंभीर झाली आहे. सोमवारी (ता. २१) राज्यातील मोठे, मध्यम आणि लघू अशा सर्व ३२६७ प्रकल्पांमध्ये ३५६.५० टीएमसी (२५ टक्के) पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी याच तारखेला सर्व प्रकल्पांमध्ये सुमारे ४६ टक्के पाणी उपलब्ध होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निम्मा पाणीसाठा झाला आहे. विदर्भ, मराठवाड्यात स्थिती चिंताजनक असून कोकण, मध्य महाराष्ट्रात धरणांचा पाणीसाठा वाढत असला तरी अद्याप पुरेसा साठा झालेला नाही.   
 

पुणे : जुलै महिना संपत आला, तरीही पावसाने पुरेशी हजेरी न लावल्याने राज्यातील पाणीसाठ्याची स्थिती गंभीर झाली आहे. सोमवारी (ता. २१) राज्यातील मोठे, मध्यम आणि लघू अशा सर्व ३२६७ प्रकल्पांमध्ये ३५६.५० टीएमसी (२५ टक्के) पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी याच तारखेला सर्व प्रकल्पांमध्ये सुमारे ४६ टक्के पाणी उपलब्ध होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निम्मा पाणीसाठा झाला आहे. विदर्भ, मराठवाड्यात स्थिती चिंताजनक असून कोकण, मध्य महाराष्ट्रात धरणांचा पाणीसाठा वाढत असला तरी अद्याप पुरेसा साठा झालेला नाही.   
 

विभागनिहाय पाणीसाठ्याचा विचार करता यंदा मराठवाड्यात अवघा १ टक्के आणि पूर्व विदर्भातील नागपूर विभागात ८ टक्के, तर पश्चिम विदर्भातील अमरावती विभागात ९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागात २० टक्के, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक विभागात २० टक्के आणि कोकण विभागात ६७ टक्के पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालावरून दिसून येते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील धरणांचा पाणीसाठा २१ टक्क्यांनी कमी आहे. गतवर्षी अमरावती विभागात ३१ टक्के, औरंगाबाद विभागात १६ टक्के, नागपूर ३५ टक्के, पुणे ६१ टक्के, नाशिक ३६ टक्के आणि कोकण विभागात ८४ टक्के पाणीसाठा झाला होता. यंदा त्यातुलनेत खूपच कमी पाणीसाठा असल्याने पुढील काळात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.  

पुणे विभागातील धरणात ३७ टक्के पाणी
पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमधील प्रमुख धरणांमध्ये यंदा २०१.२९ टीएमसी (३७ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. धरणांच्या पाणलोटात काही काळ झालेल्या पावसाने पाणीसाठ्यात अल्प वाढ झाली आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत पाणी कमी आहे. उजनी धरणाचा पाणीसाठा अचल पातळीतच असून, धरणात ४८.७८ टीएमसी आणि कोयना धरणाच्या चल आणि अचल पातळीत मिळून ५०.६९ टीएमसी पाणीसाठा आहे. विभागातील ३५ मोठ्या प्रकल्पांमध्ये १७४.३७ टीएमसी (४० टक्के), मध्यम ५० प्रकल्पांमध्ये १८.३७ टीएमसी (३८ टक्के) आणि लहान ६४१ प्रकल्पांमध्ये ८.५५ टीएमसी (१७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे.

नाशिक विभागात अपुरा पाणीसाठा
नाशिक विभागातील नगर, जळगाव, नाशिक या तीन जिल्ह्यांतील धरणांच्या पाणीसाठ्यात अद्याप समाधानकारक पाणीसाठा झालेला नाही. नाशिक, नगर जिल्ह्यांतील धरणे भरल्यानंतरच मराठवाड्याला पाणी जाणार असल्याने या भागात जोरदार पावसाची आवश्यकता आहे.  भंडारदरा (नगर), कडवा, पालखेड, भावली, दारणा, गंगाखेड (नाशिक) या सर्व धरणांमध्ये पाणीसाठा ४० टक्क्यांपेक्षा अधिक असला तरी, उर्वरित सर्वच धरणांमध्ये खूपच कमी पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिक विभागातील सर्व ५७१ प्रकल्पांमध्ये मिळून ४३.०६ टीएमसी (२० टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. नाशिक विभागातील मोठ्या २४ प्रकल्पांमध्ये ३५.२९ टीएमसी (२७ टक्के), मध्यम ५३ प्रकल्पांमध्ये ६.३३ टीएमसी (१५ टक्के) आणि लहान ४९४ प्रकल्पांमध्ये १.४३ टीएमसी (४ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

कोकणात चांगली स्थिती
कोकण विभागातील धरणांमध्ये यंदा कमी पाणीसाठा असला तरी, इतर विभागांच्या तुलनेत चांगली स्थिती आहे. कोकण विभागात सर्व प्रमुख धरणांमध्ये ८३.५३ टीएमसी (६७ टक्के) पाणीसाठा झाला आहे. यात पालघर जिल्ह्यातील कवडास बंधाऱ्यात १०० टक्के, धामणी धरणात ७४ टक्के, ठाणे जिल्ह्यातील ऊर्ध्व घाटघर धरणात ३६ टक्के, भातसा ६२ टक्के, तर निम्न चौंडे धरणात ५८ टक्के आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिल्लारी धरणात ७९ टक्के पाणीसाठा आहे. कोकणातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये ६१.४० टीएमसी (७१ टक्के), ७ मध्यम प्रकल्पांमध्ये ११.३३ टीएमसी (६६ टक्के) तर १५८ लघू प्रकल्पात १०.८० टीएमसी (५४ टक्के) पाणी शिल्लक आहे.
 
पश्चिम विदर्भात १३ टीएमसी पाणी  
पश्चिम विदर्भातील अमरावती विभागात १२.९७ टीएमसी (९ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. अमरावती विभागातही यंदा पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरण अचल पातळीतच आहे. तर बुलडाण्यातील नळगंगा, अकोल्यातील काटेपूर्णा, यवतमाळमधील इसापूर, अरुणावती धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. विभागातील १० मोठ्या प्रकल्पांमध्ये ७.१८ टीएमसी (८ टक्के), २५ मध्यम प्रकल्पांमध्ये ४.०९ टीएमसी (१७ टक्के) तर ४११ लघू प्रकल्पात १.६९ टीएमसी (५ टक्के) पाणी असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

राज्यातील जिल्हानिहाय पाणीसाठ्याची स्थिती खालील प्रमाणे : स्रोत जलसंपदा विभाग (उपयुक्त पाणीसाठा : टीएमसीमध्ये) 
उपयुक्त पाणीसाठा ३० टक्क्यांपेक्षा कमी असेलले जिल्हे : नगर १०.१९, अकोला १.०५, अमरावती ४.५५, औरंगाबाद ०.४६, बीड ०.०९, भंडारा ०.८६, बुलडाणा २.१६, चंद्रपूर १.७५, धुळे ०.६४, गडचिरोली ०.०६, गोंदिया ४.७४, हिंगोली ०.०९, जळगाव ४.९०, जालना ०.५३, लातूर ०.०२, नागपूर ४.२४, नांदेड ०.८४, नंदुरबार ३.५४, नाशिक २३.७९, उस्मानाबाद ०.०७, परभणी ०.०३, सोलापूर  ०.०७, वर्धा १.८७, वाशीम ०.०, यवतमाळ ५.२२,  
उपयुक्त पाणीसाठा ३० ते ७५ टक्के असलेले जिल्हे : कोल्हापूर ३१.८७, पुणे ७९.४३, रायगड ५.५६, रत्नागिरी ७.०२, सांगली १५.९३, सातारा ७४.०९, सिंधुदुर्ग १७.३७, ठाणे ३८.२४, 
उपयुक्त पाणीसाठा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक असलेले जिल्हे : पालघर १५.३५,

२५ जिल्ह्यांत ३० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा  
राज्यातील मुंबई शहर आणि मुंबई उपनगर वगळता उर्वरित ३४ जिल्ह्यांपैकी २५ जिल्ह्यांचा उपयुक्त पाणीसाठा ३० टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. तर ८ जिल्ह्यांमध्ये ३० ते ७५ टक्के, तर पालघर या एकाच जिल्ह्यामध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक उपयुक्त पाणीसाठा असल्याचे राज्याच्या जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आले.

मराठवाड्यात केवळ एक टक्का उपयुक्त साठा
गेली काही वर्षे सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यात धरणांच्या पाणलोटात यंदाही पावसाने ओढ दिल्याने जायकवाडीसह मांजरा, माजलगाव (बीड), येलदरी (हिंगोली), सीना कोळेगाव (उस्मानाबाद) निम्न दुधना (परभणी) ही धरणे अचल पाणीसाठ्यात गेली आहेत. जायकवाडी धरणाच्या अचल साठ्यात १८.२५ टीएमसी (१८ टक्के) पाणी आहे. विभागातील मोठ्या ४५ प्रकल्पांमध्ये ०.४७ टीएमसी म्हणजेच जवळपास शून्य टक्के, मध्यम ८१ प्रकल्पांमध्ये ०.९५ टीएमसी (३ टक्के), तर लहान ८३८ प्रकल्पांमध्ये ०.७० टीएमसी (१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. 

पूर्व विदर्भात चिंताजनक स्थिती
नागपूर विभागातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या १३.५१ टीएमसी (८ टक्के) पाणीसाठा आहे. गडचिरोलीतील दिना, बावनथडी, नागपूरमधील तोतलाडोह धरण अद्यापही मृत पातळीत आहे. विभागातील १६ मोठ्या प्रकल्पांमध्ये ८.५८ टीएमसी (७ टक्के), ४२ मध्यम प्रकल्पांमध्ये ३.०८ टीएमसी (१४ टक्के), तर ३२६ लघू प्रकल्पांत १.८५ टीएमसी (१० टक्के) पाणी शिल्लक आहे.

राज्यातील मोठे, मध्यम, लघू पाटबंधारे प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी)

विभाग प्रकल्पांची संख्या एकूण पाणीसाठा शिल्लक साठा टक्केवारी
अमरावती   ४४६   १४८.०४ १२.९७  ९
औरंगाबाद ९६४ २६०.२७ २.१३ 
कोकण १७६  १२३.९२ ८३.५३   ६७
नागपूर  ३८४    १६२.६५ १३.५१
नाशिक ५७१ २११.९७ ४३.०६  २०
पुणे   ७२६ ५३७.०३ २०१.२९  ३७
एकूण   ३२६७  १४४३.८८ ३५६.५० २५

 

इतर अॅग्रो विशेष
शेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...
‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...
विदर्भ, कोकणात पावसाची शक्यतापुणे : पावसाने उघडीप दिल्याने राज्याच्या तापमानात...
पूरग्रस्त भागात जनावरांना न्यूमोनिया, ...पुणे : सततचा पाऊस आणि पुराच्या पाण्यात भिजल्याने...
पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील...मुंबई : पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील नुकसानावर...
अण्वस्त्रांविषयी वाचाळता कशासाठी? अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या (नो फर्स्ट...
कृषी परिवर्तनाची नांदीनरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या...
कृषी ‘एमएस्सी’ प्रवेशात भेदभाव नको:...पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (...
जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन...
सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात...सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत...
महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा...कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना...
पन्नास हजारांवर पशुधन डोळ्यांदेखत गेले...कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या ...
सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘...सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात...
कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात...सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना...