पुणे जिल्ह्यात फळपीक विमा योजनेत केवळ २५० शेतकरी

फळपीक विमा योजनेत केवळ २५० शेतकरी
फळपीक विमा योजनेत केवळ २५० शेतकरी

पुणे : हवामान बदलाच्या परिस्थितीमुळे रब्बी हंगामात फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी आंबिया बहरामध्ये पुनर्रचित हवामान आधारित पंतप्रधान फळपीक विमा योजना राबविण्यात आली. या योजनेकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अक्षरशः पाठ फिरवल्याचे चित्र आहे. अवघ्या २५७ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवल्याची स्थिती आहे. त्यांनी १७ लाख १४ हजार ७५९ रुपये बँकेमार्फत विमा कंपनीला जमा केले. नुकसान झाल्यास तीन कोटी ४८ लाख ८ हजार ४७७ रुपयांपर्यंतची भरपाई मिळणार आहे. 

पंतप्रधान फळपीक विमा योजनेत जिल्ह्यातील डाळिंब, लिंबू, केळी, आंबा, द्राक्षे या फळपिकासाठी विमा योजना राबविण्यात आली. फळपीकनिहाय अधिसूचित केलेल्या तालुक्यातील महसूल मंडळात राबविण्यात आली. त्यासाठी ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत होती. यात कार्यान्वित केलेली विमा कंपनी शासनाच्या निर्देशित हवामान केंद्रामध्ये नोंदविल्या गेलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देय आहे. 

ही योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी बंधनकारक, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक होती. त्यासाठी दि न्यू इंडिया इन्शुरन्स या कंपनीची निवड करण्यात आली होती.  यंदा या फळपीक विम्यामध्ये गारपिठीमुळे नुकसान होऊ नये म्हणून विमा योजनेतून भरपाई मिळण्यासाठी ११८ शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. या शेतकऱ्यांनी बँकेमार्फत दोन लाख ८७ हजार ६३ रुपये विमा कंपनीला जमा केले. गारपिठीमुळे नुकसान झाल्यानंतर सुमारे ६२ लाख ५४ हजार ४६७ रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे.

चालू वर्षी जुन्नर तालुक्यातील ११०, दौड तालुक्यातील ५६, बारामतीतील ४५, शिरूरमधील २४ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. आंबेगाव ३, भोर १, इंदापूर १६, खेडमधील २ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. उर्वरित तालुक्यातील शेतकरी या योजनेपासून दूर असल्याचे चित्र आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com